Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे यश सिंधुदुर्गात महायुतीला मिळेल

महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे यश सिंधुदुर्गात महायुतीला मिळेल


शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण | प्रतिनिधी : राणे साहेबांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला अत्यंत पोषक आणि उत्साही वातावरण आहे. या निवडणुकीत महायुती ऐतिहासिक विजय नोंदवेल. महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे यश सिंधुदुर्गात महायुतीला मिळेल. जिल्ह्यात एक नवा विक्रम प्रस्थापित होईल. असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत तसेच भाजपा सिंधुदुर्ग उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कुंभारमाठ येथील मतदान केंद्रावर सकाळी सुरवातीलाच मतदान केल्यानंतर दत्ता सामंत, अशोक सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाऊ सामंत, मधुकर चव्हाण उपस्थित होते.

दत्ता सामंत म्हणाले माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महायुतीची वज्रमुठ अधिक घट्ट झाली आहे. ५० जिल्हा परिषद आणि १०० पंचायत समितीच्या जागांपैकी 25 जागा निवडणुकीपूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागांवर १०० टक्के यश मिळवून महायुतीचाच झेंडा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गतिमान विकास होत असताना निवडणुकीत महायुती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण झोकून देऊन काम केले. विरोधकांचे अस्तित्व आता जिल्ह्यात उरलेले नाही अशी स्थिती निर्माण झाली. जनता केवळ विकासाच्या बाजूनेच मतदान करत आहे. महायुतीने केलेल्या कामामुळे या निवडणुकीचा निकाल महाराष्ट्रात एक वेगळा विक्रम प्रस्थापित करेल, अशी खात्री आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि नेते मंडळी यांच्या नियोजनामुळे महायुती जिल्ह्यात 'नंबर वन' ठरेल, असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात महायुतीचेच वर्चस्व असेल : अशोक सावंत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच वर्चस्व असेल, असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी स्पष्ट केले.

राणे साहेबांच्या नेतृत्वात जिल्हा वेगवान विकासाच्या दिशेने

"१९९० पासून खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जिल्हा विकासाच्या दिशेने वेगाने धावत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे जिल्ह्यात नवीन चैतन्य निर्माण झाले आहे. राणे साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही भक्कम महायुती साकारली गेली आहे." जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महायुतीची लाट आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील. सर्व पंचायत समित्यांचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महायुतीचेच विराजमान होतील. महायुतीमुळे जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळणार असून विरोधकांचा सुपडा साफ होईल असेही अशोक सावंत यांनी स्पष्ट केले.

अमित खोत, मालवण

rapan bottom