Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

सर्जेकोट मिर्याबांदा 'सखी' मतदान केंद्र ठरले विशेष!

सर्जेकोट मिर्याबांदा 'सखी' मतदान केंद्र ठरले विशेष!


मतदान केंद्रावर सर्व महिला अधिकारी, कर्मचारी नियुक्त

महिला मतदारांची सर्वाधिक संख्या : उत्स्फूर्त मतदान

मालवण | प्रतिनिधी : प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा याठिकाणी उपजिल्हाधिकारी तथा मालवण निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनात सखी मतदान केंद्र करण्यात आले. सखी केंद्रावर केंद्रअध्यक्षा, अधिकारी, कर्मचारी अश्या सर्व महिला यठिकाणी कार्यरत असून महिला ही सक्षमपणे मतदान केंद्र सांभाळू शकतात हे यातून सिद्ध होते. मतदारांचा उत्साह वाढावा मतदान केंद्रावर प्रसन्न आणि आनंदी वातावरण असावे या उद्देशाने विशेष सजावट या मतदान केंद्रावर करण्यात आली होती.


मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबंदा येथे सखी मतदान केंद्र आहे. याठिकाणी भेट देत उपजिल्हाधिकारी तथा मालवण निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी आढावा घेतला. तसेच आवश्यक सूचना व मार्गदर्शन अधिकाऱ्यांना केले.

यावेळी मतदान केंद्र अध्यक्ष डॉ. सुमेधा नाईक यांसह मतदान अधिकारी अनुष्का कदम, मतदान अधिकारी राधा दिघे, मतदान अधिकारी शुभांगी लोकरे तसेच कर्मचारी सिमाली परब, सखी केंद्र झोनल अधिकारी श्वेता यादव तसेच क्षेत्रीय झोनल अधिकारी मकरंद कुलकर्णी उपस्थित होते. तालुक्यातील एकमेव महिला केंद्रअध्यक्षा म्हणून डॉ. सुमेधा नाईक या कार्यरत आहेत.

सर्जेकोट केंद्रावर 838 मतदार

प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबंदा येथे सखी मतदान केंद्र याठिकाणी 838 मतदार आहेत. यात महिला मतदारांची सर्वाधिक असून 423 महिला मतदार आहेत. तर पुरुष मतदारांची संख्या 415 आहे.

महिला सक्षमिकरण

महिला सक्षमिकरण या हेतूने सखी मतदान हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रावर सर्व महिला अधिकारी असून येथे महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. शांततेत मतदान प्रक्रिया सुरु होती. एकूणच मालवणातील सर्व मतदान केंद्रावर निवडणुक विभाग लक्ष ठेवून आहे. तसेच सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

अमित खोत, मालवण

rapan bottom