नांदरुख गावातील उबाठा शाखाप्रमुख व पदाधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश
आमदार निलेश राणे यांच्या झंझावाती विकासकार्यावर प्रेरित होऊन पक्ष पक्षप्रवेश
मालवण | प्रतिनिधी : नांदरुख गावातील उबाठा शाखाप्रमुख समीर पाटकर यांसह अन्य पदाधिकारी यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांचे झंझावाती विकासकार्य व अभ्यासू कार्यशैलीवर प्रेरित होऊन हा पक्ष पक्षप्रवेश करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेश कर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
प्रवेशकर्त्या मध्ये नांदरुख गावातील उबाठा शाखाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य समीर पाटकर यांसह माजी उपसरपंच विकास चव्हाण, माजी सरपंच स्मिता पाटकर, ग्रामपंचायत सदस्य श्रुती चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य गीता पराडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र लाड, कमलेश चव्हाण, रामचंद्र पाटकर, सुषमा चव्हाण, संदीप कांबळी, साक्षी कांबळी, दीपेश नामनाईक, योगेश नामनाईक, विजय नामनाईक, स्वप्नील चव्हाण, सतीश कांबळी, प्रियांका पाटकर, मानसी पाटकर, निशा पाटकर, जिवा घाडी, आनंद भगत, सुहास भगत, संतोष पाटकर, सोनाली भगत, भक्ती तोंडवळकर, शामसुंदर कांबळी, दिलीप भगत, अरुणा भगत, भरत तोंडवळकर, संतोष चव्हाण, गणेश भगत यांसह अन्य पदाधिकारी ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, नांदरुख सरपंच भाऊ चव्हाण, राजा गावडे, प्रितम गावडे, राजू बिडये, मधुकर चव्हाण यांसह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा उबाठाला धक्का
