Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

मालवणात 111 मतदान केंद्रावर होणार मतदान

मालवणात 111 मतदान केंद्रावर होणार मतदान

मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर रवाना : 6 जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती जागांसाठी निवडणूक : तालुक्यात 74,729 मतदार

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती जागांसाठी शनिवार 7 फेब्रुवारी रोजी 111 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात बारा झोनल अधिकाऱ्यांसह 444 अधिकाऱ्यांची नियुक्ती मतदान केंद्रावर करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावरील मतदान यंत्रे मतदान केंद्र अध्यक्ष व अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर रवाना करण्यात आली आहेत.

शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी मालवण तालुक्यातील मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे रवाना करण्यात आली आहेत.

सखी मतदान केंद्र सर्जेकोट

मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबंदा हे सखी मतदान केंद्र असणार आहे. याठिकाणी मतदान केंद्र अध्यक्ष डॉ. सुमेधा नाईक यांसह मतदान अधिकारी अनुष्का कदम, मतदान अधिकारी राधा दिघे, मतदान अधिकारी शुभांगी लोकरे तसेच कर्मचारी सिमाली परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सखी केंद्र झोनल अधिकारी म्हणून श्वेता यादव काम पाहणार आहेत. क्षेत्रीय अधिकारी म्हणून मकरंद कुलकर्णी काम पाहणार आहेत. यासोबत मालवण तालुक्यातील गोळवण जि प शाळा नं. 2 हे आदर्श मतदान केंद्र असणार आहे.

मालवण तालुक्यात 74,729 मतदार

मालवण तालुक्यात 36,626 पुरुष मतदार तर 38,103 स्त्री मतदार असे एकूण 74,729 मतदार आहेत. शनिवार 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 हा मतदानाचा कालावधी असणार आहे. तर सोमवार 9 फेब्रुवारी रोजी शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे मतमोजणी होणार आहे.

फोटो : निवडणुक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी मतदान यंत्रे निवडणुक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत पोलीस बंदोबसतात मतदान केंद्रावर रवाना केली. (अमित खोत, मालवण )

rapan bottom