Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवणात महायुतीचा विजय निश्चित!

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवणात महायुतीचा विजय निश्चित!

महायुतीचे सर्व उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होणार
महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह जनतेचा ठाम विश्वास

अमित खोत | मालवण : आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर आणि विकासकार्यावर प्रेरित होऊन मालवण तालुक्यात जनतेचा मोठा पाठिंबा सर्व ठिकाणी मिळतं आहे. जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ तालुक्यात महायुतीच्या उमेदवारांच्या विजय निश्चित आहे. असा ठाम विश्वास महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांसह ग्रामस्था मधून व्यक्त केला जात आहे.

मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व ११ पंचायत समिती मतदार संघात मोठया प्रतिसादात प्रचार करण्यात आला. महायुती जिप उमेदवार सोनाली घाडीगावकर, वर्षा सांबारी, क्षमा हडकर, सुमेधा पाताडे, अक्षता गावडे, संतोष साटविलकर यांसह पस उमेदवार दिपक चव्हाण, दिपक सुर्वे, गणेश तोंडवळकर, संजय ठाकूर, योजना कांबळी, प्रज्ञा चव्हाण, संतोष गावडे, माधुरी मसुरकर, रिया बावकर, मानसी भोगावकर, श्याम झाड या महायुतीच्या उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसादात प्रचार करण्यात आला. प्रचाराच्या सांगता दरम्यान विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

भाजपा नेते खासदार नारायण राणे साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वात महायुतीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हापरिषद व सर्व पंचायत समिती निवडणुक लढवली जात आहे. विकासाचा दृष्टिकोन ठेवून जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात महायुतीच्याच विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मालवण तालुक्याचा विचार करता ६ जिल्हापरिषद सदस्य व १२ पंचायत समिती सदस्य जागा आहेत. त्यापैकी आडवली मालडी येथील पंचायत समिती भाजपा उमेदवार सौ. सीमा सतीश परुळेकर या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षाचे संघटन बळ मालवण तालुक्यात तळागळात आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांची फौज व आमदार निलेश राणे यांचे कणखर व कार्यतत्पर नेतृत्व या जोरावर महायुतीच्या सर्वच उमेदवारांच्या मोठया विजयाची खात्री मतदारसंघात व्यक्त केली जात आहे.
मालवण तालुक्यातील सर्व मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून एकसंघ प्रचार करण्यात आला. सर्वच ठिकाणी उमेदवारांसोबत मोठया प्रमाणात कार्यकर्ते प्रचारात सहभागी आहेत. प्रचारादरम्यान मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळतं असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विजयी गुलाल महायुतीचं उडवणार असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.

rapan bottom