मतदार संघाच्या विकासासाठी शिवसेना महायुतीच्या सौ. सोनाली घाडीगांवकर यांचा बाजूने ग्रामस्थांचा कौल
मालवण : आडवली मालडी जिल्हा परिषद विभागात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीकडून सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर यांना जनतेचा पाठिंबा वाढत असूनमतदार संघाच्या विकासासाठी शिवसेना महायुतीच्या सौ. सोनाली घाडीगांवकर यांचा विजय जनतेने निश्चित केला आहे. शिवसेना चिन्हा समोरील बटण दाबून मोठया मताधिक्याने सोनाली घाडीगावकर यांना विजयी करून मतदार संघाच्या विकासासाठी राणे साहेबांचे हात बळकट करण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महायुतीच्या प्रचाराचा झंझावात सर्वत्र असून विरोधक हतबल झाले आहेत. असेच चित्र मतदार संघात दिसून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा नेते खासदार नारायण राणे साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनात शिवसेना भाजपा महायुती पदाधिकारी कार्यकर्ते एकसंघपणे प्रचारात सहभागी आहेत. राणे साहेबांच्या नेतृत्वात मोठया विजयासाठी महायुती सज्ज झाली आहे.

महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जनतेचा चांगला प्रतिसाद सर्व ठिकाणी मिळतं असून विकास महायुतीच्याच माध्यमातून होऊ शकतो असाच सुरु सर्वत्र आहे. शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना मोठया मताधिक्याने विजयी करून राणे साहेबांचे हात बळकट करूया. अश्या भावना व्यक्त होत आहेत.

