कुडाळ प्रतिनिधी | शानू वालावलकर : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यवर प्रेरित होऊन शिवसेना उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटाचे कवठी ग्रामपंचायत सदस्य भूषण बांदेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाला सर्वच ठिकाणी धक्के बसत आहेत. तर महायुती वेगाने पुढे जात आहे.
प्रचार प्रमुख तथा शिवसेना उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांच्या हस्ते उपस्थित हा पक्षप्रवेश झाला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते, माजी पंचायत समिति सदस्य प्रमोद नाईक, वालावल सरपंच राजा प्रभू, उपविभागिय अध्यक्ष मनिष वाड्येकर, शाखाप्रमुख शेखर मेस्त्री यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थिती होते.

