Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

महायुतीचे उमेदवार घनश्याम झाड, अक्षता गावडे यांचा देवबाग गावात झंझावाती प्रचार

महायुतीचे उमेदवार घनश्याम झाड, अक्षता गावडे यांचा देवबाग गावात झंझावाती प्रचार

वायरी भुतनाथ मतदार संघात महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास

मालवण | प्रतिनिधी : वायरी भूतनाथ पंचायत समिती मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार घनश्याम झाड तसेच जिल्हापरिषद मतदार संघाच्या शिवसेना महायुतीच्या उमेदवार अक्षता गावडे यांचा झंझावाती प्रचार देवबाग गावात करण्यात आला. सर्व ठिकाणी मतदारांचा मिळणारा पाठिंबा पाहता महायुतीचे उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, नगरसेवक सहदेव बापार्डेकर, दाजी सावजी, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, हरी खवणेकर यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी होते.

भाजपा नेते खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनातं महायुतीच्या माध्यमातून घरोघर प्रचार केला जात आहे. महायुती सरकारच्या जनहिताच्या योजना, केलेल्या विकास कामांच्या जोरावर वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघातून अक्षता गावडे, आणि पंचायत समिती उमेदवार घनश्याम झाड मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जनतेत राहून सेवाभावी वृत्तीने काम करणारे नेतृत्व घनश्याम झाड यांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता मोठया मताधिक्याने ते विजयी ठरतील. महायुतीचे सर्वचं उमेदवार विजयी होतील. असा विश्वास व्यक्त होत आहे.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom