मालवण | प्रतिनिधी शानू वालावलकर: आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यवार प्रेरित होऊन सातत्याने शिवसेनेत पक्षप्रवेश सुरु आहेत. जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत वायरी भूतनाथ विभागाच्या दौऱ्यावर असताना उबाठा गटाच्या सदस्य गौरी जोशी, चंदना प्रभू यांसह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक नगरसेवक महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, उमेश नेरुरकर, बुवा भालचंद्र केळूसकर, तालुका प्रमुख मंदार लुडबे, भाई मांजरेकर, महेश लुडबे यांसह दाजी जोशी, चंद्रकांत प्रभू, भाई ढोके, अर्जुन मोंडकर, कमलेश ढोके, प्रवीण मेस्त, अरुण बटाव, विठोबा मोंडकर, बाबी तरी, सुधीर जोशी, विष्णू ढोके, हेमंत मेस्त, बाळू केरकर, निशा तोडणकर , किरण हुर्णेकर, आतिकेश हुर्णेकर, शंकर सागवेकर, अखिल ढोके, सर्वेश ढोके, ओमकार केळुसकर, वैभव मांजरेकर, कुंदन जोशी यांसह अन्य उपस्थित होते.
उबाठा तालूकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच भगवान लुडबे यांच्या मनमानी कारभाला कंटाळुन उबाठा पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अशी माहिती भाई मांजरेकर यांनी दिली.
▪️अमित खोत, मालवण

