Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आचरा, चिंदर विभागात महायुतीच्या तीनही उमेदवारांचा विजय निश्चित!

आचरा, चिंदर विभागात महायुतीच्या तीनही उमेदवारांचा विजय निश्चित!


महायुतीचे आचरा पंचायत समिती उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पंचायत समिती उमेदवार दिपक सुर्वे तसेच जिल्हापरिषद उमेदवार वर्षा सांबारीना जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद

मालवण | स्काय न्युज टुडे : आचरा जिल्हा परिषद मतदार संघात पंचायत समितीचे शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पंचायत समिती भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार दिपक सुर्वे तसेच आचरा जिल्हापरिषद शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवार वर्षा मांगरीश सांबारी यांना जनतेतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महायुतीच्या तीनही उमेदवारांचा विजय निश्चित आहे. असा विश्वास व्यक्त होत आहे.



सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून भाजपा जेष्ठ नेते खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत आणि महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या एकसंघ प्रचारात निवडणुक लढवल्या जात आहेत. निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळून भाजपा शिवसेना महायुतीचे 25 सदस्य बिनविरोध विजयी झाले. ही विजयाची नांदी ठरली असून जनतेचा कौल विकासाच्या दृष्टीने महायुतीच्याच उमेदवारांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत आहे.



मालवण तालुक्यात महायुतीच्या उमेदवारांचा प्रभावी प्रचार सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. गावोगाव घरोघर प्रचार यंत्रणा राबवून मतदारांच्या भेटी घेतल्या जात आहेत. विकासकामांसाठी महायुतीच हवी असाच सुरु सर्वत्र असून महायुतीच्या उमेदवारांना जनतेतूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. जनतेतून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महायुतीचे आचरा पंचायत समिती उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पंचायत समिती उमेदवार दिपक सुर्वे तसेच जिल्हापरिषद उमेदवार वर्षा सांबारी मोठया मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.



▪️अमित खोत | मालवण

rapan bottom