Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

समाजसेवेचा वसा घेऊन करू सुकळवाड पंचायत समितीचा विकास

समाजसेवेचा वसा घेऊन करू सुकळवाड पंचायत समितीचा विकास

सुकळवाड पंचायत समिती मतदार संघात भाजपा महायुतीच्या संतोष गावडे यांना जनतेचा वाढता पाठिंबा

प्रचारात जनतेचा मिळतोय सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद : जिल्हापरिषद मतदार संघात शिवसेना महायुतीच्या सुमेधा पाताडे यांच्याही विजयाचा विश्वास

मालवण | प्रतिनिधी : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुकळवाड पंचायत समिती मतदार संघाचे भाजपा महायुतीचे संतोष दत्तात्रय गावडे हे उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीच्या माध्यमातून त्यांचा गावागावात प्रचार सुरु असून मतदारांचा वाढता पाठींबा लक्षात घेता त्यांच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून भाजपा जेष्ठ नेते खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लढवल्या जात आहेत. निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळून भाजपा शिवसेना महायुतीचे 25 सदस्य बिनविरोध विजयी झाले. ही विजयाची नांदी ठरली असून जनतेचा कौल विकासाच्या दृष्टीने महायुतीच्याच उमेदवारांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत आहे.

मालवण तालुक्यातही महायुतीच्या उमेदवारांचा प्रभाव सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. सुकळवाड पंचायत समिती मतदार संघातून भाजपा महायुतीचे संतोष गावडे तसेच सुकळवाड जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेना महायुतीच्या सुमेधा पाताडे निवडणूक रिंगणात आहेत. गावागावात घरोघर प्रचार यंत्रणा राबवून मतदारांच्या भेटी घेतल्या जात आहेत. विकासकामांसाठी महायुतीच गरजेची असून महायुतीच्या उमेदवारांना जनतेतूनही पाठिंबा मिळत आहे. जनतेतून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सुकळवाड पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संतोष गावडे व जिल्हा परिषद उमेदवार सुमेधा पाताडे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अमित खोत, मालवण

rapan bottom