Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

महायुतीची वीण घट्ट ; निर्विवाद विजय निश्चित!

महायुतीची वीण घट्ट ; निर्विवाद विजय निश्चित!

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

महायुतीचे उमेदवार घनश्याम झाड, अक्षता गावडे यांचा तारकर्लीत उत्स्फूर्त प्रचार

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्रच महायुतीच्या उमेदवारांना जनतेतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतं आहे. सर्व ठिकाणी महायुतीची घट्ट वीण असून भाजपा नेते खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत या सर्वांच्या नेतृत्वात महायुतीचे उमेदवार निर्विवाद विजय मिळवतील. महायुतीला शतप्रतिशत यश मिळेल. असा ठाम विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी तारकर्ली येथे बोलताना व्यक्त केला.

वायरी भूतनाथ पंचायत समिती मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार घनश्याम झाड तसेच जिल्हापरिषद मतदार संघाच्या शिवसेना महायुतीच्या उमेदवार अक्षता गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ तारकर्ली येथील श्री महापुरुष मंदिरात श्रीफळ ठेऊन करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीच्या माध्यमातून घरोघर प्रचार केला जात आहे. महायुती सरकारच्या जनहिताच्या योजना, केलेल्या विकास कामांच्या जोरावर वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार सांघातून अक्षता गावडे, आणि पंचायत समिती उमेदवार घनश्याम झाड मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

येथील पंचायत समितीचे उमेदवार घनश्याम झाड हे जनतेत राहून सेवाभावी वृत्तीने काम करणारे नेतृत्व आहेत. घनश्याम झाड यांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता मोठया मताधिक्याने ते विजयी ठरतील. एकूणच कुडाळ मालवण तालुक्यातही सर्वच्या सर्व जागांवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. असा विश्वास प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom