आ. निलेश राणे यांच्या झंझावाती विकासकार्यावर जनता प्रभावित
प्रचारात महायुतीच्या सर्वच उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
▪️अमित खोत | मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात आमदार निलेश राणे यांनी विकासाचा झंझावात निर्माण केला आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर आणि विकासकार्यावर प्रेरित होऊन जनतेचा मोठा पाठिंबा मिळतं असून प्रत्येक निवडणुकीत 'विजय' हेच सूत्र दिसून येत आहे. आगामी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत ही आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ तालुक्यात महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.
भाजपा नेते खासदार नारायण राणे साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वात महायुतीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हापरिषद व सर्व पंचायत समिती निवडणुक लढवली जात आहे. निवासणुकीपूर्वी भाजपा शिवसेना पक्षाचे 8 जिल्हापरिषद सदस्य तसेच 16 पंचायत समिती सदस्य असे एकूण 25 सदस्य बिनविरोध विजयी झाले. निवडणुकीतील महायुतीच्या विजयाची ही नांदी ठरली आहे. जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात महायुतीच्याच विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मालवण तालुक्याचा विचार करता 6 जिल्हापरिषद सदस्य व 12 पंचायत समिती सदस्य जागा आहेत. त्यापैकी आडवली मालडी येथील पंचायत समिती भाजपा उमेदवार सौ. सीमा सतीश परुळेकर या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षाचे संघटन बळ मालवण तालुक्यात तळागळात आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांची फौज व आमदार निलेश राणे यांचे कणखर व कार्यतत्पर नेतृत्व या जोरावर महायुतीच्या सर्वच उमेदवारांच्या मोठया विजयाची खात्री मतदारसंघात व्यक्त केली जात आहे.
मालवण तालुक्यातील सर्व मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून एकसंघ प्रचार सुरु आहे. सर्वच ठिकाणी उमेदवारांसोबत मोठया प्रमाणात कार्यकर्ते प्रचारात सहभागी आहेत. प्रचारादरम्यान मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळतं असल्याचे चित्र आहे.
आडवली मालडी
राणे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले आडवली मालडी विभागाचे जेष्ठ नेतृत्व माजी सभापती सुनील घाडीगावकर यांच्या पत्नी सौ. सोनाली घाडीगावकर पुन्हा एकदा जिल्हापरिषद निवडणूक रिंगणात आहेत. घाडीगावकर यापुर्वी मोठे मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या होत्या. तर सुनील घाडीगावकर हे सरपंच ते पंचायत समिती सभापती असे सातत्याने तीन दशके या विभागाचे नेतृत्व करत कार्यरत आहेत. जनतेच्या सेवेत आहेत. या मतदारसंघात शिवसेना महायुतीची मोठी ताकद आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे विशेष लक्ष या मतदार संघावर नेहमीच राहिले. त्यांच्या मार्गदर्शनात शिवसेना तालुकाप्रमुख बाईत तसेच माजी सभापती राजू परुळेकर, महेंद्र चव्हाण यांसह शिवसेना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते एकसंघपणे प्रचार करतं आहेत. या मतदारसंघातील पंचायत समितीतून सीमा परूळेकर (भाजप) या बिनविरोध विजयी झालेल्या आहेत. तर शिरवंडे पस मतदारसंघातून शिवसेना महायुतीकडून दीपक (बंडू) चव्हाण हे निवडणुक लढत आहेत. या मतदारसंघात महायुतीचा विजयी विश्वास व्यक्त केला जात आहे.
आचरा
आचरा जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना महायुतीकडून वर्षा मंगिरीश सांबारी तर आचरा पंचायत समितीसाठी शिवसेनेचे गणेश तोंडवळकर व चिंदर पंचायत समितीसाठी भाजपाचे दीपक सुर्वे हे निवडणूक रिंगणात आहेत. तिन्ही ठिकाणी महायुतीकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. याठिकाणी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे यांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भक्कम साथीने महायुतीच्या विजय निश्चितच होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
मसुरे मर्डे
मसुरे मर्डे मतदारसंघात भाजपा महायुतीकडून क्षमा संदीप हडकर निवडणुक रिंगणात आहेत. पंचायत समितीमध्ये शिवसेनेकडून माजी उपससभापती संजय उर्फ छोटू ठाकूर तर कोळंब पंचायत समितीकडून भाजपाच्या योजना कांबळी हे महायुतीचे उमेदवार आहेत. शिवसेना भाजपा महायुतीची मोठी ताकद या मतदार संघात आहे. प्रचारात चांगला प्रतिसाद असून महायुती उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त होत आहे.
सुकळवाड
सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना महायुतीकडून माजी जिप अध्यक्षा सौ. सुमेधा पाताडे या पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या सोबत पोईप पस मतदार संघात शिवसेना महायुतीकडून प्रज्ञा चव्हाण तसेच सुकळवाड पस मधून भाजपाचे संतोष गावडे हे महायुतीचे उमेदवार आहेत. या मतदारसंघात मजबुत संघटना याठिकाणी कार्यरत आहेत. याठिकाणीही महायुतीचे उमेदवार विजयी होणार असा विश्वास व्यक्त होत आहे.
पेंडूर
पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना महायुतीकडून माजी जिप वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर हे अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व निवडणुक रिंगणात आहेत. तसेच वराड पंचायत समितीत भाजपा महिला तालुकाध्यक्षा माधुरी मोहन मसुरकर आणि पेंडूर पस मधून शिवसेनेकडून रिया बावकर या निवडणुक रिंगणात आहेत. महायुतीचे मोठे बळ आणि जनतेच्या आशिर्वादामुळे महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
वायरी भूतनाथ
वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचे डॅशिंग नेतृत्व राजा गावडे यांच्या पत्नी अक्षता गावडे या महायुतीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्यासोबत कुंभारमाठ पंचायत समितीसाठी शिवसेनेच्या मानसी प्रमोद भोगावकर आणि वायरी भुतनाथ पंचायत समितीसाठी भाजपाचे शाम चंद्रकांत झाड हे निवडणुक रिंगणात आहेत. भोगावकर आणि शाम झाड यांनी ग्रामपंचायतीमध्ये काम केल्याचा चांगला अनुभव आहे. एकूणच मोठा जनसंपर्क तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची खंबीर साथ यामुळे मालवण तालुक्यात महायुतीच्या उमेदवारचा विजय निश्चित आहे. सर्वच ठिकाणी हा विश्वास व्यक्त होत आहे.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवणात महायुतीच्या मोठया विजयाचा विश्वास!
