पंचायत समिती उमेदवार घनश्याम झाड, जिल्हापरिषद उमेदवार अक्षता गावडे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण | प्रतिनिधी : वायरी भुतनाथ पंचायत समिती व जिल्हापरिषद मतदारसंघात महायुतीचा घरोघर प्रचार सुरु आहे. सोमवारी मोरेश्वर देवस्थान (मोरयाचा धोंडा) येथे श्रीफळ वाढवत देवतांचे आशीर्वाद घेऊन भाजपा-शिवसेना महायुतीच्या माध्यमातून प्रचार फेरी काढण्यात आली.

वायरी भुतनाथ पंचायत समितीचे भाजपा महायुतीचे उमेदवार घनश्याम झाड तसेच शिवसेना महायुतीच्या जिल्हापरिषद उमेदवार अक्षता राजन गावडे यांना मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतं आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता
घनश्याम झाड तसेच अक्षता गावडे मोठया मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

भाजपा नेते खासदार नारायण राणे साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वात महायुतीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हापरिषद व सर्व पंचायत समिती निवडणुक लढवली जात आहे. शिवसेना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते एकसंघपणे प्रचारात सहभागी आहेत. राणे साहेबांच्या नेतृत्वात मोठया विजयासाठी महायुती सज्ज झाली आहे. महायुती सरकार माध्यमातून जास्तीत जास्त विकासनिधीच्या माध्यमातून मोठा विकास होऊ शकतो. हा विश्वास व्यक्त होत असताना सर्व ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा वाढत आहे.
वायरी भुतनाथ येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोरयाचा धोंडा या देवस्थानजवळ श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी महायुतीच्या जिल्हा परिषद उमेदवार अक्षता गावडे, तर पंचायत समितीचे उमेदवार शाम झाड यांसह महायुतीचे पदाधिकारी मंदार लुडबे, राजा गावडे, नगरसेवक महेश कोयंडे, मंदार केणी, भालचंद्र केळुस्कर, अशोक तोडणकर, केदार झाड, अरुण तळगावकर, मिलिंद झाड, देवानंद लोकेगावकर, भाई मांजरेकर, बबन गावकर, दाजी सावजी, मोहन कुबल, संदीप बोडवे, पांडू मायनाक, कविता मोंडकर, ज्योती तोडणकर, मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, निकिता तोडणकर, नेहा तोडणकर, छोटू सावजी, अर्जुन मांजरेकर, निशा तोडणकर, मुन्ना झाड, गणेश सातार्डेकर, कान्हा माडयें, हेमंत चव्हाण, पश्या नाईक यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
राणे साहेब तसेच सर्व नेतेमंडळी यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात वायरी भुतनाथ मतदारसंघात जास्तीत जास्त विकासनिधी आणून अधिकाधिक विकासकामे पुर्ण करणे. जनतेला अपेक्षित असा विकास त्यांच्या मागणी नुसार करणे. शासनाच्या सर्व योजना तळागळातील जनतेपर्यत पोहचवणे अधिकाधिक लाभ मिळवून देणे हेच आपले पाहिले कर्तव्य राहणार आहे. असे पंचायत समिती उमेदवार घनशाम झाड यांनी सांगितले. सर्व ठिकाणी प्रचारादरम्यान जनतेचा मिळणारा पाठिंबा आणि प्रतिसाद पाहता या पंचायत समिती मतदार संघात घनशाम झाड यांचा विजय निश्चित आहे. सोबतच महायुतीच्या जिल्हापरिषद उमेदवार अक्षता गावडे यांना मोठे मताधिक्य या मतदार संघातून मिळेल. असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.
अमित खोत, मालवण

