Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

वराड पंचायत समिती मतदारसंघात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

वराड पंचायत समिती मतदारसंघात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद


विकासाचा दृष्टिकोन पाहता जनतेचा माधुरी मसुरकर व संतोष साटविलकर यांना वाढता पाठिंबा


मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात पंचायत समिती व जिल्हापरिषद निवडणुकीत महायुतीचाच बोलबाला सर्वत्र दिसून येत आहे. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. वराड पंचायत समिती व पेंडूर जिल्हापरिषद मतदारसंघात महायुतीचा गावागावात घरोघर प्रचार सुरु असून सर्व ठिकाणी मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता वराड पंचायत समिती मतदारसंघात भाजपा महायुतीच्या माधुरी मसुरकर विजयी होतील. तसेच शिवसेना महायुतीचे जिल्हापरिषद उमेदवार संतोष साटविलकर यांना वराड विभागातून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.



भाजपा नेते खासदार नारायण राणे साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वात महायुतीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हापरिषद व सर्व पंचायत समिती निवडणुक लढवली जात  आहे. शिवसेना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते एकसंघपणे प्रचारात सहभागी आहेत. राणे साहेबांच्या नेतृत्वात मोठया विजयासाठी महायुती सज्ज झाली आहे. महायुती सरकार माध्यमातून जास्तीत जास्त विकासनिधीच्या माध्यमातून मोठा विकास होऊ शकतो. हा विश्वास व्यक्त होत असताना सर्व ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा वाढत आहे.

पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना महायुतीकडून माजी जिप वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर हे अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व निवडणुक रिंगणात आहेत. तसेच वराड पंचायत समितीत भाजपा महिला तालुकाध्यक्षा माधुरी मोहन मसुरकर या निवडणुक रिंगणात आहेत. माधुरी मसुरकर  सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत दिसून येतात. गावच्या तसेच पंचायत समिती मतदारसंघाच्या विकासाची तळमळ त्यांच्यात आहे. गावांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी त्या नेहमीच प्रयत्नाशील असतात. पंचायत समिती निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने त्या मोठया मताधिक्याने विजयी झाल्यास राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मतदार संघात आणून जनतेला अपेक्षित असे विकासकार्य करण्याचा विश्वास त्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.

आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. जास्तीत जास्त निधी आणून संपुर्ण मतदार संघात विकास करायचा आहे. आदर्श असा मतदारसंघ बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे माधुरी मसुरकर यांनी  प्रचारा दरम्यान सांगितले.

फोटो : घरोघर प्रचार करताना भाजपा महायुतीच्या वराड पस उमेदवार माधुरी मसुरकर तसेच शिवसेना महायुतीचे पेंडूर जिप उमेदवार संतोष साटविलकर.


अमित खोत, मालवण

rapan bottom