Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

महायुतीला १०० टक्के यश मिळणार!

महायुतीला १०० टक्के यश मिळणार!


शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

झाराप, सुकळवाड येथे बंडखोरांवर कारवाई होणार


मालवण | प्रतिनिधी : जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला १०० टक्के यश मिळणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.

राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीला सर्वच ठिकाणी पोषक वातावरण दिसून येत असून महायुतीचा झेंडा जिल्हापरिषद व पंचायत समितीवर पुन्हा एकदा फडकेल. असे दत्ता सामंत यांनी सांगितले.

जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब, शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग संपर्क मंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात महायुतीच्या माध्यमातून एका संघपणे व एक विचारणे नियोजनबद्ध प्रचार महायुतीच्या सर्व उमेदवारांचा सुरू आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जनतेचे सरकार असून राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचेच अर्थात जनतेचे सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत महायुतीला जनतेने कौल दिला. नव्वद टक्के पेक्षा जास्त ठिकाणी महायुती विजय ठरले आहे. आता होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही महायुतीची विजयी घोरदर अशीच सुरू राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे.

या निवडणुकीत विरोधकांचे कोणतेच आव्हान नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. उबाठा पक्षाची ही शेवटचीच निवडणुक आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे. जनता विकासाचा दृष्टिकोन ठेवून महायुतीच्या पाठीशी खंबीर उभी आहे त्यामुळे महायुतीला या निवडणुकीत शंभर टक्के यश मिळणार आहे.

मालवण कुडाळ मतदार संघात अभ्यासू आणि कार्यतत्पर असे नेतृत्व आमदार निलेश राणे यांच्या रूपाने लाभले आहे. त्यांचा आवाज प्रत्येक अधिवेशनात घुमत आहे. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी मतदार संघात येत आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ मतदार संघातील 15 जिल्हा परिषद व 30 पंचायत समिती जागांवर महायुतीचा झेंडा फडकेल. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. असा ठाम विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.

अनिकेत तेंडोलकर यांचे निलंबन

कुडाळ तालुक्यातील झाराप मतदार संघात अनिकेत तेंडोलकर यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे महायुतीचा विचार करता वरिष्ठांच्या आदेशानुसार अनिकेत तेंडोलकर यांचे शिवसेना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. याबाबत मित्रपक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली आहे. आमचा पाठिंबा भाजप शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच आहे. अशी माहिती दत्ता सामंत यांनी दिली.

सुकळवाड येथे संतोष गावडे भाजपा शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार

सुकळवाड पंचायत समिती येथे भाजप शिवसेना महायुतीचे संतोष गावडे हे अधिकृत उमेदवार आहेत. या ठिकाणी असलेले अपक्ष उमेदवार प्रसाद मोरजकर यांच्याशी आमचा संबंध नाही. मोरजकर यांनी वर्षभरापूर्वी उबाठातून भाजप पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. असे असताना प्रचारादरम्यान ते आमच्या नेत्यांची नावे घेत असतील तर ते चुकीचे आहे. प्रसाद मोरजकर यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. भाजप महायुतीचे संतोष गावडे हेच आमचे अधिकृत उमेदवार आहेत. असे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

rapan bottom