Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

तारकर्ली एमटीडीसी कार्यालय आगीत जळून खाक

तारकर्ली एमटीडीसी कार्यालय आगीत जळून खाक


शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ; लाखो रुपयांचे नुकसान

मालवण | प्रतिनिधी : तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कार्यालयाला सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीच्या भडक्यात संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले.



आग लागल्याचे लक्षात येताच कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठया प्रमाणात भडकलेल्या आगीवार नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. घटनेची माहिती मिळताच मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शर्तीचे प्रयत्न करून अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.



आगीत एमटीडीसी कार्यालयातील संगणक, फर्निचर, कागदपत्रे तसेच अन्य कार्यालयीन यंत्रणा जळून खाक झाल्या. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  हे कार्यालय लाकडी बोटीच्या प्रतिकृतीच्या स्वरुपात उभारण्यात आले होते. लाकडी बांधकाम असल्यामुळे सर्व जळून गेले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायविंग अँड ॲक्वाटिक स्पोर्ट्स (इसदा) च्या प्रभारी व्यवस्थापक दीपिका वस्त यांनी घटनेची पाहणी केली. यावेळी तलाठी ज्ञानेश्वर वायाळ यांनी आगीचा पंचनामा केला. आग विझविण्यासाठी एमटीडीसी चे कर्मचारी तसेच ग्रामस्थ विजय टक्के, सिद्धेश चव्हाण, धनंजय झाड, जितेश वस्त, नितीन कोळंबकर, राहुल करलकर, संदीप मालवणकर, विशाल गोसावी, योगेश देऊलकर, सत्यवान देऊलकर, किशोर आडारकर, कुणाल बापर्डेकर, थॉमसन फर्नांडिस, कमलेश नाईक, अक्षय भगत, सुलक्षण पाटकर, संतोष शेवाळे,  देवेंद्र मयेकर, नंदकुमार जोशी, जयवंत सावंत, संतोष झाड, गणेश साळगावकर, राघोबा गोसावी यांसह अन्य नागरिकांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सहभाग घेतला.

अमित खोत, खोत

rapan bottom