मालवण | प्रतिनिधी : तारकर्ली येथील मच्छिमार भालचंद्र उर्फ दाजीबा कुबल यांची मासेमारी होडी व जाळी जळून नुकसान झाले होते. मोठे संकट कोसळलेल्या दाजीबा कुबल या मच्छिमारास आवारवाडी ग्रुपतर्फे जाळी ची मदत करण्यात आली. यावेळी बबलू मोंडकर, भाऊ मोर्जे, विष्णू मालंडकर, पांडू मालंडकर, अक्षय मोर्जे, निलेश मोंडकर, जाॅन फर्नाडीस, बंटी परब, डेविड फर्नाडीस, राजेश हुले, इसेज डीसोजा, मंगेश कोयंडे, प्रविण पराडकर आदी उपस्थित होते.
अमित खोत, मालवण

