Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

शिवसेना महायुतीच्या विजयाचा आडवली मालडी जिल्हापरिषद विभागात व्यक्त होतोय विश्वास

शिवसेना महायुतीच्या विजयाचा आडवली मालडी जिल्हापरिषद विभागात व्यक्त होतोय विश्वास

सौं. सोनाली सुनील घाडीगावकर यांच्याकडून मतदारसंघात प्रचाराचा धडाका

सर्वच ठिकाणी कार्यकर्ते, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : महायुती सरकारच्या माध्यमातून राणे साहेबांच्या नेतृत्वात नव्या विकासपर्वासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आडवली मालडी जिप मतदार संघातून सौं. सोनाली सुनील घाडीगांवकर निवडणुक रिंगणात आहेत. जनतेचा भक्कम पाठिंबा व आशीर्वादाने त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मतदार संघात व्यक्त होत आहे.

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या विचारांचा बालेकिल्ला म्हणून 1990 पासून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आडवली मालडी जिल्हा परिषद विभागात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व आरपीआय महायुती कडून सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर ह्या निवडणूक रिंगणात आहेत. हा विभाग मागील ३५ वर्षांपासून खासदार नारायण राणे तसेच गेली अनेक वर्षे आमदार निलेश राणे यांच्या पाठीशी राहिला आहे. आजपर्यंत या विभागात झालेल्या प्रत्येक विकासकामात खा. नारायण राणे यांचे मोठे योगदान नेहमीच राहिले.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यातून माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी मोठे विकासकार्य या मतदार संघात केले. हा मतदारसंघ आपले कुटुंब मानून घाडीगावकर सेवाकार्य करतं असतात. तसेच सौ. घाडीगावकर यांनी या विभागातून २०१२ ते २०१७ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले. मागील पाच वर्षांच्या अनुभव त्यांच्या सोबत असून आमदार निलेश राणे यांच्या भक्कम पाठिंब्यात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि सुनील घाडीगावकर आणि महायुती पदाधिकारी यांच्या नेतृत्वात विकासाचे व्हिजन ठेवून वाटचाल सुरु आहे. विभागातील प्रत्येक गावागावात असणाऱ्या कार्यकर्त्यांचे भक्कम बळ घेऊन प्रचारात आघाडी घेतल्याची भावना सौ. घाडीगांवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आडवली मालडी जिल्हा परिषद विभाग हा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली सुनील घाडीगांवकर तसेच त्यांच्या सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या विभागात १९९० पासून मजबूत संघटन बांधणी केली आहे. राणेसाहेबांनी १९९० पासून विभागातील सर्वच गावच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. सर्व गावे रस्त्यानी जोडली. राणे साहेबांच्या मार्गदर्शनात सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती अश्या विविध पदावर काम करत गावचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करणारे सुनील घाडीगांवकर हेच खऱ्या अर्थाने विकासाचे केंद्रबिंदू राहिले. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात सुनील घाडीगांवकर यांनी विभागाच्या विकासात मोलाचे योगदान नेहमीच देण्याच्या प्रयत्न केला आहे. मागील दहा वर्षांच्या काळात 2014 ते 2024 मालवण मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार, खासदार असल्याने हा विभाग विकास कामांपासून वंचित राहिला होता. त्यामुळे काही ठिकाणचे अंतर्गत रस्ते खराब झाले असून ग्रामस्थांना किरकोळ समस्या भेडसावत आहेत.

मात्र आता पुन्हा एकदा राणे पर्व जिल्ह्यात आले आहे. खासदार राणे साहेब, आमदार निलेश राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून शिरवंडे गावाच्या आणि संपुर्ण आडवली मालडी जिल्हापरिषद मतदार संघाच्या नव्या विकासपर्वासाठी सौं. सोनाली सुनील घाडीगांवकर जिल्हापरिषद सदस्य म्हणून सज्ज होत आहेत.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात सुनील घाडीगावकर यांची खंबीर साथ पत्नी सोनाली घाडीगावकर यांना आहे. त्यांनी यापूर्वी पाच वर्षे जिल्हापरिषद सदस्य म्हणून काम केल्याचा अनुभव त्यांना फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून नव्या विकासपर्वा साठी आणि जनतेच्या सेवेसाठी सौं. सोनाली सुनील घाडीगावकर जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा विजयी होणार. असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

अमित खोत, मालवण

rapan bottom