Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

पारंपरिक मच्छीमार आंदोलनातील सर्व ९३ संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता

पारंपरिक मच्छीमार आंदोलनातील सर्व ९३ संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता



मालवण | प्रतिनिधी : आचरा समुद्रकिनारी २०१६ साली झालेल्या पारंपरिक मच्छीमार आंदोलनातील सर्व ९३ संशयित आरोपींची सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने काल निर्दोष मुक्तता केली.

३० ऑक्टोबर २०१६ रोजी आचरा बंदर येथे अनधिकृत पर्ससीन मासेमारीच्या विरोधात श्रमिक मच्छीमार संघ आणि आचरा बंदर मच्छीमार संघटनेने मत्स्य विभागाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारले होते. या आंदोलनादरम्यान दोन गटांत मोठा संघर्ष झाला होता. याप्रकरणी पारंपरिक मच्छीमारांवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा यांसह मारहाण आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. या आंदोलनाची दखल राज्य सरकारलाही घ्यावी लागली होती आणि त्यानंतर मासेमारी कायद्यात मोठे बदल करण्यात आले होते.

ओरोस जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी गेली १० वर्षे सुरू होती. या खटल्यात मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर, छोटु सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, सन्मेष परब, आकांक्षा कांदळगावकर यांच्यासह ९३ जणांवर आरोप होते. येथील ज्येष्ठ वकील ॲड. उल्हास कुलकर्णी यांनी भक्कम बाजू मांडली. त्यांना ॲड. प्राची कुलकर्णी, ॲड. अमेय कुलकर्णी यांनी सहकार्य केले. सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व ९३ संशयित आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.

निकालांनंतर प्रतिक्रिया देताना ॲड. उल्हास कुलकर्णी म्हणाले की, "गेल्या १० वर्षांपासून हा लढा सुरू होता. पारंपरिक मच्छीमारांनी आपल्या हक्कासाठी हे आंदोलन केले होते. आज न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे या कष्टकरी मच्छीमारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
या निकालाचे स्वागत करत श्रमिक मच्छीमार संघ आणि जिल्ह्यातील सर्व संघटनांनी आभार मानले आहेत.

rapan bottom