Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांच्या पुढाकाराने वायरी हिंदळेकर वाडीतील "पथदीप उजळले…

नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांच्या पुढाकाराने वायरी हिंदळेकर वाडीतील "पथदीप उजळले…

मालवण : मालवण नगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीत एक वर्षाहून अधिक काळ पथदीपाविना अंधारात असलेल्या मालवण शहरातील वायरी हिंदळेकर वाडीतील जी-१० पासून पुढील ७ विजेच्या खांबावरील स्ट्रीटलाईट मालवण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या प्रयत्नाने
अखेर प्रकाशमान झाल्याने या मार्गांवर असलेले अंधाराचे साम्राज्य दूर झाले आहे नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून झाडीझुडपे साफ करून घेत हा रस्ता प्रकाशमान केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मालवण शहरातील वायरी हिंदळेकर वाडीतील या मुख्य रस्त्यावरील पथदीप गेल्या वर्षभरापासून बंद होते. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना येण्या-जाण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे याची मागणी केली होती, परंतु प्रशासकीय राजवटीच्या काळात याकडे दुर्लक्ष झाले होते.
निवडून आल्यानंतर या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी तातडीने कार्यवाही केली. विद्युत वाहिन्यांमध्ये अडथळा ठरलेली झाडे आणि झाडी स्वतः उभे राहून साफ करून घेतली. तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर या भागातील ७ पथदीप पुन्हा एकदा उजळले आहेत.

या निमित्ताने बोलताना नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी नागरिकांची सुरक्षा आणि सुविधा हीच आमची प्राथमिकता आहे. रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्ट केले.

rapan bottom