मालवण | प्रतिनिधी : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा सन्मान ठेवून पक्ष नेत्यांच्या आदेशानुसार आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघातून माघार घेतली. असे सांगत सौ. मानसी मोहन वेंगुर्लेकर यांनी मतदार संघातील बंधू भगिनी व शिवसेना कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत जनतेच्या सेवेसाठी कायम कार्यरत राहणार असल्याचे सांगितले आहे.
आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघातील शिवसैनिक कार्यकर्त्यांचा सन्मान राखून आमदार नीलेश राणे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत या सर्वांनी माझावर व शिवसेना कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली होती. त्याबद्दल सर्वांचे लाख लाख आभार. मात्र महायुतीचा विचार करता
पक्षश्रेष्ठीचा आदेशाप्रमाणे मला आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघातून माघार घ्यावी लागली. मतदार संघातील बंधू आणि भगिनींनी व शिवसेना कार्यकर्त्यांनी माझा पाठीशी ठामपणे उभे राहून मला सहकार्य केलात हाच माझा विजय मानून सर्वांचे लाख लाख आभार मानते. असे सौ. मानसी मोहन वेंगुर्लेकर यांनी सांगितले आहे.

