रेवताळे सागरी महामार्गवरील धोकादायक चर घेतला बुजवून
मालवण | प्रतिनिधी : महावितरणच्या भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. रेवताळे सागरी महामार्गवर मोठा चर मारण्यात आला होता. धोकादायक स्वरूपातील या चर मुळे अपघात घडत होते. याबाबत माहिती मिळताच भाजपा नगरसेवक ललित चव्हाण यांनी प्रशासनाला सुचाना देत धोकादायक चर तत्परतेने बुजवून घेतला. दरम्यान अन्य ठिकाणी मार्गात असे चर असतील तर ते तात्काळ बुजवून घेण्यात यावेत अश्या सूचना ललित चव्हाण यांनी संबंधित प्रशासनास दिल्या आहेत.
यावेळी युवा मोर्चा बूथ अध्यक्ष निनाद बादेकर, संज्या खोत, समीर मडये, अजय आळवे उपस्थित होते.

