मोठया संख्येने उपस्थित रहा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय समोरील पटांगणावर बुधवार 28 जानेवारी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे. या भव्य जाहीर सभेला मोठया संख्येने उपस्थित रहा असे आवाहन करण्यात आले आहे.

