Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवणात बिनविरोध विजयाने महायुतीने खाते खोलले

मालवणात बिनविरोध विजयाने महायुतीने खाते खोलले


भाजप महायुतीच्या सीमा परूळेकर बिनविरोध विजयी

मालवणात 17 जगासाठी 41 उमेदवार निवडणुक रिंगणात


मालवण | प्रतिनिधी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 80 उमेदवारी अर्ज पैकी 39 उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत मागे घेतले. आता जिप 6 जागासाठी 13 उमेदवार तर पंचायत समिती 11 जागासाठी 28 उमेदवार रिंगणात आहेत.
आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघातून ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज अंतिम क्षणी मागे घेतल्याने भाजप उमेदवार सीमा परूळेकर या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यावेळी विजयाचा जल्लोष केला.

मालवण तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी  तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गणेश लव्हे, कणकवली गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी मागे घेण्याची कार्यवाही झाली. यावेळी राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

जिप 6 जागासाठी 13 उमेदवार

आडवली मालडी जिल्हा परिषद गटात सोनाली घाडीगांवकर (शिवसेना), माधुरी सावंत (उबाठा), आचरा संजना रेडकर (उबाठा), वर्षा सांबारी (शिवसेना), मसुरे- क्षमा हडकर (भाजप), आनंदी परब (उबाठा), सुकळवाड गौतमी तळगावकर (वंचित बहुजन आघाडी), पूजा चव्हाण (उबाठा), सुमेधा पाताडे (शिवसेना), पेंडुर गटात संतोष साटविलकर (शिवसेना), घनःश्याम राणे (उबाठा), वायरी भूतनाथ साक्षी लुडबे (उबाठा), अक्षता गावडे (शिवसेना पुरस्कृत अपक्ष) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी सहा मतदार संघात १३ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. तर एकूण दाखल उमेदवारी अर्ज पैकी १४ उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. सहा जिल्हा परिषद पैकी सुकळवाड या ठिकाणी तिरंगी लढत होणार असून इतर पाच ठिकाणी दुरंगी लढत होत आहे.

पंचायत समिती 11 जागासाठी 28 उमेदवार

आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर (भाजप) बिनविरोध, शिरवंडे युवराज मेस्त्री (उबाठा), दीपक चव्हाण (शिवसेना), चिंदर दीपक सुर्वे (भाजप), समीर लब्दे (उबाठा), महेंद्र मांजरेकर (काँग्रेस), आचरा लवू मालंडकर (उबाठा), प्रवीण आचरेकर (काँग्रेस), गणेश तोंडवळकर (शिवसेना), जुबेर काझी (अपक्ष), कोळंब योजना कांबळी (भाजप), पूजा गवंडी (उबाठा), मसुरे मर्डे वैभव चव्हाण (उबाठा), संजय ठाकूर (शिवसेना), पोईप प्रज्ञा चव्हाण (शिवसेना), शुभ्रा मांजरेकर (अपक्ष), प्राजक्ता परब (उबाठा), सुकळवाड प्रसाद मोरजकर (अपक्ष), प्रणय मयेकर (उबाठा), संतोष गावडे (भाजप), वराड माधुरी मसुरकर (भाजप), दीक्षा रेवडेकर (उबाठा), पेंडुर सप्तशीला धामापूरकर (उबाठा), रिया बावकर (शिवसेना), कुंभारमाठ प्रणिता लंगोटे (उबाठा), मानसी भोगावकर (शिवसेना), वायरी भूतनाथ पास्कोल रॉड्रीग्ज (उबाठा), देवानंद लुडबे (काँग्रेस), घनःश्याम झाड (भाजप) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पंचायत समिती मतदार संघात एका ठिकाणी बिनविरोध झाल्याने आता अकरा जागांसाठी २८ उमेदवार लढत देत आहेत. तर उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी तब्बल २३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर विजय निश्चित


आमदार निलेश राणे यांच्या कार्य कर्तृत्वावर व विकास कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत अनेक पक्षप्रवेश होत आहेत. याचं प्रमाणे या निवडणुकीतही आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर वीजय निश्चित असल्याचा विश्वास सर्व ठिकाणी व्यक्त होत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार यांनीही आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेताना मतदार संघात आमदार निलेश राणे महायुतीचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला.

विजयी सुरवात 100 टक्के विजयाची : धोंडी चिंदरकर

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी हा महायुतीचा विजय असल्याचे स्पष्ट केले. आमचे नेते खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आणि भक्कम पाठिंब्यावर तालुक्यात युतीच्या सर्वच्या सर्व जागा विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अपक्ष म्हणून दाखल केलेले बहुतांश उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानतो, अशा शब्दात धोंडी चिंदरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मालवण तालुक्यात भाजपा महायुतीचा हा पहिला विजय आमच्या यशाची सुरुवात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा सिंधुदुर्गातील विजयोत्सवाच्याच सभा ठरणार आहेत, असाही विश्वास श्री. चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, महेंद्र चव्हाण, राजू परुळेकर, महेश मांजरेकर, दिपक सुर्वे, अरूण मेस्त्री, बंडू गावडे, सुमीत सावंत, पंकज सादये, दया हाटले, भाई घाडीगावकर, शुभम मठकर, संतोष बाईत, विजय निकम, सुभाष लाड, संतोष गांवकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अमित खोत, मालवण

rapan bottom