शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहावे
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय समोरील पटांगणावर बुधवार 28 जानेवारी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे. या भव्य जाहीर सभेला मालवण कुडाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती विभागातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या कणकवलीत भव्य जाहीर सभा
