प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा
मालवण : मालवण तालुक्यात राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत असणारे चिंदर गावचे रहिवासी समीर हडकर यांनी उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
समीर हडकर यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, मी शिवसेना (उबाठा) पक्षामध्ये गेली दहा वर्षे राजकारण आणि समाजकारण करत होतो. त्याद्वारे लोकांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. परंतु बदललेल्या राजकारणामुळे शिवसेना (उबाठा) पक्षामध्ये सुद्धा गटातटाचे आणि सोहीचे राजकारण सुरू झाले. त्याचीच परिणीती स्थानिक पातळीवर झाली. त्याकडे आपण हेतूपुरस्कर दुर्लक्ष केले. आपण निर्माण केलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे मी शिवसेना पक्षाचा प्राथमिक सदस्याचा राजीनामा आपल्याकडे देत आहे.भविष्यात आपल्या पक्षाला उभारी मिळावी आणि आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद ! जय महाराष्ट्र, आपला, शिवसैनिक, समिर चंद्रकांत हडकर.

समीर हडकर यांचा उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र
