मालवण : वायरी भूतनाथ येथील उद्योजक आणि पर्यटन व्यावसायिक श्री मिलिंद झाड यांचा 60 वा वाढदिवस नुकताच विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने त्यांनी वायरी भूतनाथ येथील प्राथमिक शाळा नंबर 1 येथील विद्यार्थ्यांना शिक्षणिक साहित्याचे वाटप केले तर बालवाडी मधील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच भगवान लुडबे, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण तळगावकर, देवानंद लोकेगावकर, नेहा रंजन तांबे, प्रिया शिवराम सावंत, राखी लक्ष्मण शिंदे, बबन गावकर, प्राची माणगावकर, प्रदीप वेंगुर्लेकर, वंदना गोसावी, दीपाली झाड, शाम, पांडू मायनाक, यांसह अन्य उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मिलिंद झाड यांचे आभार व्यक्त केले.

उद्योजक मिलिंद झाड यांचा 60 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
