Thursday, 29 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

कांदळगाव श्री देव रामेश्वराचे सर्वत्र उत्साहात स्वागत

कांदळगाव श्री देव रामेश्वराचे सर्वत्र उत्साहात स्वागत


मालवण : कांदळगाव ग्रामदैवत स्वयंभू श्री  देव रामेश्वर वारेसूत्र, तरंग, राणे परब मानकरी, कांदळगाव ग्रामस्थ व रयतेसह शिवकालीन परंपरेनुसार किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि आदी माया श्री देवी भवानी यांची भेट घेऊन रात्रभर मालवण मेढा येथील मौनीनाथ मंदिरात मुक्काम केला. शनिवारी सकाळी श्री देव रामेश्वराने मेढा भागातील शिवकालीन कुशे वाड्याला भेट देत भाविकांना आशिर्वचन दिले. दुपारी श्री देव रामेश्वराने आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह मालवण बाजारपेठेतील रामेश्वर मांडला भेट दिली व पुढे मार्गक्रमाणा सुरु ठेवली.



कांदळगाव येथील श्री देव रामेश्वराचा सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व आदिमाया भवानी यांच्याशी होणारा पारंपारिक भेट सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. श्री देव रामेश्वराने किल्ला भेटी नंतर सायंकाळी दांडी येथे श्री देव दांडेश्वराची भेट घेऊन मेढा, राजकोट येथील मौनीनाथ मंदिर गाठले. त्याठिकाणी भाविकांना दर्शन देतानाच रात्री वास्तव्य करत विश्रांती घेतली. यावेळी मेढा येथील बालगोपाळ मंडळातर्फे रामेश्वराची पूजा अर्चा करण्यात आली तसेच भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. श्री देव रामेश्वराने मौनीनाथ मंदिर येथून मेढा येथीलच ऐतिहासिक कुशे वाडा येथे भेट दिली. त्यावेळी कुशे कुटुंबियांकडून रामेश्वराचे स्वागत व पूजन करण्यात आले.



त्यानंतर श्री देव रामेश्वर पुन्हा वाजत गाजत आपल्या लवाजम्यासह मालवण सोमवार पेठ येथील रामेश्वर मांडाकडे निघाले. त्यावेळी मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर, उपनगरध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सहदेव बापार्डेकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेविका सौ. अश्विनी कांदळकर, मेघा सावंत, बाळू अंधारी, मोहन वराडकर, राजा गावकर, परशुराम पाटकर, दिलीप वायंगणकर, गणेश प्रभूलकर, छोटू तारी आदी व इतर उपस्थित होते.



यावेळी देवांच्या स्वागतासाठी मेढा ते रामेश्वर मांड रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक सडे व रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मेढा येथे दोन पिंपळ महापुरुष विकास मंडळाच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मेढा रामगल्ली येथील महिलांकडून शीतपेय वाटप करण्यात आले. नागरिकांनी रामेश्वराचे स्वागत करत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तर दैवज्ञ भवन येथे दैवज्ञ हितवर्धक समाजातर्फे रामेश्वराचे फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत करून पूजन करण्यात आले. दुपारी सोमवार पेठ येथील श्री रामेश्वर मांड येथे श्री देव रामेश्वर दाखल झाल्यावर रामेश्वर मांड मित्रमंडळाच्या वतीने पालखी व देव तरंगांचे पूजन करण्यात आले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.



या सर्व भेटी गाठीनंतर सायंकाळी श्री देव रामेश्वर आपल्या लवाजम्यासह कोळंब गावच्या दिशेने रवाना झाला. कोळंब मांगरी येथील श्री देव महापुरुष देवस्थान येथे रात्री पालखी तरंग यांचे आगमन झाल्यानंतर त्याठिकाणी विसर्जन आणि मुक्काम करण्यात आला.

अमित खोत, मालवण

rapan bottom