Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

खासदार नारायण राणे यांनी जाणून घेतली मालवणातील भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका

खासदार नारायण राणे यांनी जाणून घेतली मालवणातील भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका




उमेदवारी अर्ज वरून मालवणात महायुतीत निर्माण झालेला वाद शांत

कणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मालवण तालुक्यात महायुतीतील भाजपच्या जागांवरील उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेने एबी फॉर्म देऊन उमेदवारी दिल्यावरून भाजप तालुकाध्यक्ष यांनी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कणकवली येथे भाजपा नेते खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत बैठक होऊन चर्चा झाली. महायुतीत अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज भरलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे स्पष्ट करण्यात आले.

मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेने एबी फॉर्म दिल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी कणकवली येथे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, संतोष गावकर, दाजी सावजी यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते.

भाजप उमेदवारांच्या विरोधात ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत, त्यांना आपले अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन नारायण राणे यांनी दिले. त्याचबरोबर ज्यांनी एबी फॉर्म दिले त्यांनाही सांगितले जाईल असे स्पष्ट केले.  एबी फॉर्म वरून जो वाद निर्माण झाला होता तो खासदार राणेंच्या मध्यस्थीने अखेर शमला आहे.

rapan bottom