मालवण | प्रतिनिधी : कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभु श्री देव रामेश्वर वारेसूत्र, तरंग, राणे, परब मानकरी, कांदळगांव ग्रामस्थ व रयतेसह त्रैवार्षिक भेट सोहळ्यानिमित्त हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी मातेच्या भेटीला निघाले. तीन दिवसीय हा सोहळा संपन्न होत असताना कांदळगाव येथील उमेश कोदे यांनी श्री देव रामेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज भेट सोहळा माहिती पत्रक संपादित केले.
या माहिती पत्राचे प्रकाशन देव भेट सोहळा निमित्ताने मालवण बंदर जेटी बाजूला असलेल्या जोशीमांड येथे करण्यात आले. यावेळी उद्योजक डॉ. दिपक परब, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, गटनेत्या पूनम चव्हाण, नगरसेवक महेश कांदळगावकर, सहदेव बापार्डेकर, मेघा सावंत, अश्विनी कांदळकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, कुडाळ मालवण सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, शेखर गाड, आशिष आचरेकर यांसह भाविक उपस्थित होते.
अमित खोत, मालवण

श्री देव रामेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज भेट सोहळा माहिती पत्रकाचे प्रकाशन
