Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवण नगरी 'भक्ती सागरात' चिंब

मालवण नगरी 'भक्ती सागरात' चिंब


कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर छत्रपती शिवाजी महाराज व भवानी मातेची भेट

ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती


मालवण | प्रतिनिधी : कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक पारंपारिक त्रैवार्षिक भेट सोहळा किल्ले सिंधुदुर्ग येथे शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी देव मार्गात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मालवण नगरी भक्तीसागरात चिंब झाली.



देव रामेश्वर मार्गावर गुढ्या, तोरणे, पताका, कमानी, फलक उभारले असून रांगोळ्या घालण्यात आल्या. विद्युत रोषणाई करण्यात आली. ठिकठिकाणी देवाचे स्वागत करत हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविक सज्ज होते.

सकाळी ९ वाजता देव रामेश्वर वारेसुत्र, तरंग, राणे, परब मानकरी, कांदळगांव ग्रामस्थ व रयतेसह मालवण येथे प्रयाण केले. ठिकठिकाणी भाविकांनी दर्शन घेतले. व्यापारी संघाने तसेच नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व नगरसेवक नागरिक यांनी मालवण नगरीत स्वागत केले. दुपारी जोशी मांड मेढा मालवण येथे आगमन, नंतर होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे देव रामेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज व आदिमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक भेट सोहळा संपन्न झाला. सायंकाळ नंतर देव दांडेश्वर मंदिराची भेट घेऊन त्यानंतर मौनीनाथ मंदिर, मेढा मालवण येथे श्री देव रामेश्वर मुक्काम साठी पोहचले.



24 रोजी सकाळी ८ वाजल्यानंतर कुशेवाडा मेढा येथे प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबियांना पारंपरिक भेट व आशीर्वाचन. नंतर दुपारी रामेश्वर मांड बाजारपेठ येथे आगमन,  भाविकांना दर्शन व आशीर्वचन नंतर रामेश्वर मांड मंडळातर्फे उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी आणि भंडारी हायस्कूलच्या पाठीमागील हॉलमध्ये भाविकांना महाप्रसादाचे आयोजन. तेथून रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर, कांदळगावला परतीचा प्रवास. सायं. ४ नंतर, रात्री ८ वा. देव महापुरुष देवस्थान (मांगरी) कोळंब येथे पालखी, तरंग यांचे त्या दिवसासाठी विसर्जन आणि मुक्काम. नंतर गणेश (अवि) नेरकर यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन. नंतर कांदळगावला जाणाऱ्या भाविकांसाठी नेरकर यांच्यामार्फत मोफत वाहनांची सोय करण्यात आली आहे.

रविवार, २५ रोजी दुपारी १ वा. व रात्री १० वाजता कोळंब महापुरुष देवस्थान येथे महाप्रसाद, नंतर आशीर्वचन देऊन देव रामेश्वर, इतर वारेसुत्र, पालखी, तरंग, भाविक आणि गावघर, कांदळगाव स्वगृही परतीच्या प्रवासाला निघणार. वाटेत आशीर्वचन देत देत रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथे या ऐतिहासीक तीन दिवसीय सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, कांदळगाव, मानकरी व ग्रामस्थांनी दिली आहे.

अमित खोत, मालवण

rapan bottom