Thursday, 29 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

घरफोडीतील आरोपी मुंबईतून अटक

घरफोडीतील आरोपी मुंबईतून अटक


स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गची कारवाई

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथे झालेल्या घरफोडी प्रकरणातील संशयीत आरोपी
प्रसाद सुधाकर चव्हाण सध्या रा. मुंबई मूळ रा. मालवण याला सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली. दरम्यान मालवण पोलिसांनी
प्रसाद सुधाकर चव्हाण याला मालवण न्यायालयात हजर केले असता त्याला 26 जानेवारी पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मालवण येथील घरफोडी प्रकरणी मालवण पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. 109/2025, BNS 2023 चे कलम 305, 331(3), 331(4) नुसार दिनांक 24 जुलै 2025 रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. 

सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषणावरून तसेच रेकॉर्डवरील आरोपी निष्पन्न झाला.

सदर गुन्ह्याचे तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी प्रसाद सुधाकर चव्हाण,  वय 25, मूळ रा. भरड, ता. मालवण. सध्या रा. राजेंद्रनगर, बोरिवली पूर्व, मुंबई यास सिद्धार्थ नगर बोरिवली येथून 22 रोजी शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून गुन्ह्याच्या पुढील तपास कामी मालवण पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्री. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कु.नयोमी साटम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप निरीक्षक अनिल हाडळ, किरण देसाई, विल्सन डिसोझा, आशिष जामदार यांनी केली. सायबर पोलिस ठाण्याचे प्रथमेश गावडे यांनी या कामी तांत्रिक मदत केली. अशी माहिती देण्यात आली.

rapan bottom