मालवण : शिवसेना मसुरे विभागीय अध्यक्ष संतोष पालव यांनी विभागीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना देण्यात आले आहे. अशी माहिती संतोष पालव यांनी दिली आहे.
संतोष पालव यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, मी जि. प. मसुरे मतदार संघाचा, शिवसेना विभागिय अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारल्या पासून प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले. गेली ३० वर्ष आपल्यावर विश्वास ठेवून मा. राणे साहेबांशी, मा. निलेश राणे साहेबांशी एकनिष्ठ राहिलो. दोघेही साहेब ज्या-ज्या पक्षात असतील तेथे प्रामाणिकपणे काम केले. परंतु मला माझ्या कामाची पोचपावती आपण दिलेली असल्याने व मला आता सदर पदावर काम करायला वेळ देता येणार नसल्याने मी माझे विभागिय अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.
असे राजीनामा पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना देण्यात आले आहे. अशी माहिती संतोष पालव यांनी दिली आहे.

मसुरे शिवसेना विभागीय अध्यक्ष संतोष पालव यांचा राजीनामा
