शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन चाफेखोल येथील उबाठा पदाधिकाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्ते गोविंद घाडीगावकर यांना उप विभागप्रमुख तसेच अन्य प्रवेशकर्ते शशिकांत घाडीगांवकर, रविकांत गोसावी, मयुरी घाडीगावकर, मिलिंद जाधव यांना पदाधिकारी नियुक्ती देण्यात आली.
यावेळी जिल्हापरिषद शिवसेना उमेदवार सुमेधा पाताडे, पंचायत समिती उमेदवार प्रज्ञा चव्हाण यांसह अनिल कांदळकर, राजू प्रभूदेसाई, पंकज वर्दम, भाऊ चव्हाण, विश्वास गांवकर, किसन मांजरेकर, किरण प्रभू, दया प्रभूदेसाई, अल्पेश निकम, हर्षद पारकर, कमलाकर पारकर, मारुती थोरवशी यांसह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ व प्रवेशकर्ते उपस्थित होते. अशी माहिती देण्यात आली आहे.
अमित खोत, मालवण

चाफेखोल येथील उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
