Thursday, 29 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

हा भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय!

हा भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय!



युती असताना भाजपाच्या जागांवर शिंदेशिवसेच्या काही उमेदवारांना एबी फॉर्म

भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मांडली संतप्त भुमिका ; वरिष्ठ नेत्यांचे वेधले लक्ष

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये आमचे नेते खासदार नारायण राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा आणि शिवसेना शिंदे गट महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवित आहोत. युतीची घोषणा झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार व युतीचे प्रमुख खासदार नारायण राणे यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम सुरू केले. मात्र, युती झाल्या नंतर उमेदवारी अर्ज दाखल होत असताना भाजपा लढवत असलेल्या काही जागांवर शिवसेनेने उमेदवार उभे करून एबी फॉर्म देण्यात आले. हे असेच होणार असेल तर भाजपा कार्यकर्ते किती दिवस अन्याय सहन करणार ? की भारतीय जनता पार्टी शिवसेनेला दान केली आहे? असा सवाल भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेत धोंडी चिंदरकर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरसेवक मंदार केणी, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, महेंद्र चव्हाण, विजय निकम, दिपक सुर्वे, संतोष गांवकर, पंकज सादये, देवेंद्र हडकर, सीमा परुळेकर, रश्मी लुडबे, बंडू गावडे, गौरव लुडबे, सुशील गावडे यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी चिंदरकर म्हणाले, आमचे नेते राणे साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही महायुती म्हणून निवडणुकिला सामोरे जात आहोत. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी महायुतीमध्ये भाजप पक्षाला सुटलेल्या जागांचे जे एबी फॉर्म माझ्याजवळ दिले होते. त्यामध्ये मसुरे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीमधील आडवली मालडी, चिंदर, कोळंब, देवबाग, सुकळवाड, वराड या जागांचे एबी फॉर्म दिले गेले होते. परंतु एखादा फॉर्म बाद झाला तर अधिक फॉर्म पण माझ्याजवळ देऊन ठेवले होते. मात्र जिल्हाध्यक्ष यांच्या स्पष्ट सुचना होत्या की, युतीमध्ये ज्या जागा आपल्याला सुटलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही एबी फॉर्म देता येणार नाहीत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टीचे तंतोतंत पालन केले. मात्र   आमच्या ज्या जागा सुटल्या त्यापैकी काही जागांवर शिंदे सेना उमेदवारी देण्यात आली.

एका बाजूने विरोधकांना अंगावर घेण्याचे काम धोंडी चिंदरकर करत असताना पक्षाचे आदेश तंतोतंत पाळले. या निवडणूकीमध्ये युती झाली. आमची मागणी जादा जागांची असताना कमी जागा मिळाल्या मात्र आम्ही वरिष्ठ नेत्यांचे आदेश  पाळले. कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि एकमताने नावे ठरवली व पक्षाचे एबी फॉर्म दिले.

मात्र कार्यकर्त्यांच्या सहनशिलतेलाही एक अंत असतो. मी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आमच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही राजीनामा  देऊन पळणार नाही. पण वारंवार एवढा अन्याय होऊन कमी जागा मिळून भाजप पक्षाच्या उमेदवार विरुद्ध मित्र पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म मिळतं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करायचे काय आणि दाद कोणाजवळ मागायची ?

राणे साहेब आमचे नेते आहेत. त्यांच नेतृत्त्व हा जिल्हा मानतो तर नारायण राणे यांच्या आदेशाला जर कोणी तिलांजली लावत असेल तर ज्या कोणी आमच्या विरुद्ध एबी फॉर्म दिले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का? नारायण राणे साहेब हे केवळ भाजप पक्षाचे नेते नसून महायुतीचे नेते आहेत त्यांनी याबाबत भुमिका घ्यावी.

मी गेली ३५ वर्षे राजकारण समाजकारणात आहे. राजकारण मलाही कळते. सातत्याने कार्यकर्त्यांवर अन्याय होईल आणि आम्ही सर्व सहन करायचे हे होणार नाही.

कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक झाला तर पक्षांने आम्हाला जबाबदार धरू नये. आम्ही पक्ष मानणारे आहोत. पक्षाचे आदेश मानतो आणि तशाप्रकारे काम करत आहोत.

असे होत राहिले तर भारतीय जनता पक्ष मालवणमध्ये ठेवायचा आहे की तो शिंदे शिवसेनेला दान करायचा आहे हा प्रश्न आहे. भले एबी फॉर्म रिमुव्ह होतील परंतु ज्यांनी कोणी एबी फॉर्म दिले त्यांच्यावर कारवाई होणार की नाही हे महत्त्वाचे आहे. धोंडी चिंदरकर थांबणार नाही. मी कार्यकर्त्यांसाठी बलिदान देण्यासाठी तयार आहे. परंतु हा अन्याय मालवण तालुका म्हणून मी सहन करणार नाही. वातावरण बिघडवीण्याचे काम होत असेल आणि ज्यांनी एबी फॉर्म दिले त्यांच्यावर कारवाई गरजेची आहे.

सातत्याने भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. भाजपचे कार्यकर्ते भरडले जायचे. अनेक लोकांचे राजिनामे माझ्याजवळ आले. मी त्यांची समजूत घातली आणि थांब म्हणून सांगितले. कार्यकर्ते मला सांगत होते की, चिंदरकर तुम्ही अंधारामध्ये आहात तुमच्या नकळत आमच्या विरुद्ध एबी फॉर्म दिले गेले. नक्की कोण गुमराह करत आहे. राणे साहेब सांगतात लढणारे कार्यकर्ते व्हा, मी लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा कार्यकर्ता नाही. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर येथे कणकवली पॅटर्न होऊ शकतो.

मी मांडलेली भुमिका चुकीची असेल तर पक्षातून काढून टाकले. माझ्यावर कारवाई केली तरी मी भुमिका मांडणार. मला खूप काही बोलायचे आहे. आता मी फक्त दोन टक्केच बोललो आहे. अजून ९८ टक्के वेळ आल्यावर बोलेनच. घडलेली गोष्ट ही अक्षम्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची हालत ना घर का ना घाट का अशीच काहीशी झाली आहे. माझी व्यथा चुकीची असेल तर माझ्यावर कारवाई करा. कारण पक्षाच्या जिवावर किंवा कोणत्याच नेत्याच्या जिवावर माझं दुकान चालू नाही. मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी कोणाच्या जिवावर जगत नाही त्यामुळे मला भिती नाही. असेही चिंदरकर यांनी स्पष्ट केले.

rapan bottom