आरोपींच्यावतीने ॲड. स्वरूप नारायण पई व ॲड. यतिश खानोलकर यांनी काम पाहिले
मालवण : हडी येथील अवैध वाळू वाहतुक तपासणीवेळी तत्कालीन तहसीलदार व महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर डंपर घालून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणातील चार संशयित आरोपीची मे. अति. जिल्हा व सत्र न्यायालय ओरोस यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. स्वरूप नारायण पई व ॲड. यतिश खानोलकर यांनी काम पाहिले.
16 जानेवारी 2019 रोजी रात्रौ 10. 30 वाजताच्या दरम्याने तत्कालीन मालवण तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांचे पथकासहीत अवैध वाळू वाहतुक तपासणी करताना हडी मार्गेश्वर मंदिराकडील वाळू वाहतुक करणारा अडविलेला. डंपर पंचनामा सुरू असताना त्रयस्थ इसमांनी येऊन डंपर पळवून नेताना अडवायला आलेल्या महसूल अधिकाऱ्यांवर डंपर घालून त्याना मारण्याचा प्रयत्न केल्याच्या व सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यामधील आरोपी गुंडू पोमन्ना राठोड वय 35 रा. चौके ता. मालवण, अमोल हेमंत चव्हाण वय 45 राह चौके ता. मालवण, योगेश घनश्याम भिसळे वय 38 राह. हडी ता. मालवण व गुरूप्रसाद जनार्दन आचरेकर वय 50. राह. हडी ता. मालवण यांची मे. जिल्हा व सत्र न्यायालय ओरोस यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
दि. 16/01/2019 रोजी रात्रौ 10. 30 वाजताच्या दरम्याने तत्कालीन मालवण तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांचे पथकासहीत अवैध वाळू वाहतुक तपासणी करताना हडी मार्गेश्वर मंदिराकडील वाळू वाहतुक करणारा डंपर थांबवून त्याचा पंचनामा व चालकाचा जबाब नोंद करत होते. तेथे अचानक तीन इसम येऊन महसूल कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालु लागले. त्याचवेळी त्यामधील एका ईसमाने डंपर मधे चढून डंपर सुरु केला व त्यामधील वाळू ओतली आणि डंपर घेऊन पळून जात होता. त्याला अडवण्यासाठी महसूल कर्मचारी गेले असता डंपर चालकाने वेगात डंपर त्यांच्या अंगावर घातला तेव्हा कर्मचारी बाजूला झाल्याने डंपर घेऊन पळून गेला. त्यानंतर तहसिलदारांनी पोलिसांना घटनास्थळी बोलावले व घटनास्थळावरील दुचाकी जप्त करण्या आल्या. त्यानंतर तत्कालीन तहसिलदार मालवण यांनी मालवण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन भा. दं. वि. कलम 307,353,379, 336,201,504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासकामाअंती वरील चार संशयीतांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने मालवण पोलिसांनी संशयीतांविरूद्ध मे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सुनावणी दरम्याने सरकारपक्षाने एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणी अखेर साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासातील त्रुटी व आरोपींतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद विचारात घेऊन मे. जिल्ह्या व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग यांनी सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

चार संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता
