Thursday, 29 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सोमवार आठवडा बाजार दिवशी वाहतुकीचे नियोजन करा

सोमवार आठवडा बाजार दिवशी वाहतुकीचे नियोजन करा



शिवसेना नगरपरिषद गटनेत्या पूनम चव्हाण व नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाचे वेधले लक्ष

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्ग येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजारावेळी वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आठवडा बाजारा दिवशी वाहतुकीचे नियोजन करा. अशी मागणी शिवसेनेना नगरपरिषद गटनेत्या नगरसेविका सौ. पूनम चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्यासह नगरसेवक सहदेव बापर्डेकर, सिद्धार्थ जाधव, नगरसेविका मेघा गावकर, अश्विनी कांदळकर, शेखर गाड, अमित सावंत, हरमलकर आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, मालवण शहराच्या प्रवेशद्वारा जवळील परिसरात आठवडा बाजार भरला जातो आणि त्यादिवशी त्याठिकाणी रस्त्याच्या (सागरी महामार्ग) दोन्ही बाजुंनी भाजी विक्रेते तसेच इतर व्यापारी आपला भाजीपाला तसेच इतर विक्रीचा माल घेवून बसलेले असतात.

तसेच बाजारासाठी आलेले ग्राहक, नागरीक यांची मोठी वर्दळ त्याठिकाणी असते आणि अशी गर्दीची परिस्थिती असताना त्याठिकाणी अवजड वाहने दोन्ही बाजुने ये-जा करीत असतात आणि त्यावेळी त्याठिकाणी वाहतुकीचा मोठा अडथळा होत असतो. तसेच काही ना काही लहानमोठे अपघात घडत असतात आणि त्यातून दुखापत होते. तसेच वादाचे मुद्दे निर्माण होत असतात. 

तरी त्याठिकाणी त्या एक दिवसापुरता वाहतुकीचा आपल्या पध्दतीने पर्यायी मार्ग काढावा. आडारी रोड ते सागरी महामार्ग अशी व्यवस्था करावी. आपणांस व्यापारी व सर्व नागरिकांच्यावतीने ही विनंती करीत आहे. त्यावर आपण गांर्भीयाने विचार कराल आणि वाहतुकीचे नियोजन कराल अशी खात्रीशीर आशा आहे, असे सौ. चव्हाण यांनी म्हटले आहे.

अमित खोत, मालवण

rapan bottom