Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

हिंदू धर्म रक्षण व जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय रील स्पर्धा

हिंदू धर्म रक्षण व जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय रील स्पर्धा

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : हिंदू धर्मावर येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी तसेच तरुण पिढीमध्ये धर्माबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मालवण प्रखंडाच्या वतीने जिल्हास्तरीय रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आंगणेवाडी यात्रेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे धर्मप्रसारक मालवण प्रमुख अविनाश सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण येथील हॉटेल अदिश येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विश्व हिंदू परिषद प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत, हिंदू परिषदेचे धर्मप्रसारक मालवण प्रमुख अविनाश सामंत, बजरंग दल मालवण प्रखंड संयोजक गणेश चव्हाण, जिल्हा बजरंग दल संयोजक कृष्णा धुळप्पनवार, जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर यांच्यासह अमोल गावडे, अनिकेत फाटक, तेजस चव्हाण, प्रसाद हळदणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अवि सामंत म्हणाले, आजही ग्रामीण भागात गरीब व गरजू हिंदू कुटुंबांना पैशांचे आमिष दाखवून धर्मांतराचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रभावी जनजागृती आवश्यक आहे. सध्याची तरुण पिढी सोशल मीडियावर सक्रिय असल्याने, तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून हिंदू धर्माचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
धर्मरक्षण व हिंदू संस्कृती या विषयावर आधारित या स्पर्धेत विजेत्यांना अनुक्रमे ११,१११ रुपये, ७,७७७ रुपये, ५,५५५ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार असून, यासोबतच उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, बालकलाकार व उत्कृष्ट दिग्दर्शक यांनाही विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत.

आंगणेवाडी यात्रेत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विशेष कार्यालय उभारण्यात येणार असून, यात्रा कालावधीत कार्यकर्ते उपस्थित राहून भाविकांना हिंदू धर्माच्या कार्याची माहिती देतील. त्याचवेळी या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत हिंदुत्वाची ताकद वाढवणे गरजेचे आहे, असे मत प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत यांनी व्यक्त केले. तसेच या उपक्रमाला बळ देण्यासाठी कोकण विश्व हिंदू परिषदेचे अनिरुद्ध भावे, बजरंग दलाचे श्री. ठाकूर यांच्यासह रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त हिंदूंनी या धर्मकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom