Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

महायुती म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एकत्र लढणार

महायुती म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एकत्र लढणार



भाजप नेते खासदार नारायण राणेंची अधिकृत घोषणा

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना नेतृत्वाखाली निवडणूक लढवणे बाबत महायुती बैठकीत एकमुखी निर्णय

लवकरच जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर होणार

कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी - सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे यांनी दिली.

कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, माजी आ. प्रमोद जठार, माजी आ. अजित गोगटे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, काका कुडाळकर, संजू परब आदी उपस्थित होते.

खासदार नारायण राणे पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महायुतीची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई महानगर पालिका निकालानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून विरोधकांचा धुव्वा उडवला जाईल असा इशाराही खा. नारायण राणे यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले, महायुती सरकारच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकासप्रकल्प उभारण्यात आले. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सर्वांगीण पूर्तता करण्यात आली असून, चिपी विमानतळाची विमानसेवा आता पूर्णपणे सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुरळीतपणे कार्यरत असून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले असून या विकासात विरोधकांचे कोणतेही योगदान नाही. त्यामुळे जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप आणि शिवसेनेलाच आहे, असा ठाम दावा खासदार नारायण राणे यांनी केला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला आज किंवा उद्या जाहीर करण्यात येणार असून, प्रचाराचा अधिकृत शुभारंभ शनिवारी सायंकाळपासून होणार आहे. आगामी निवडणुकीत महायुती शंभर टक्के विजय मिळवेल, असा विश्वास देखील खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.

दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, महायुतीची निवडणूक विषयक बैठक पार पडली असून जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.

rapan bottom