खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
कणकवली : भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येथे महानगरपालिकेच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यात अनेक महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अशा युतीच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्यात आली. याचा जल्लोष कणकवलीत प्रहार भवन च्या समोर करण्यात आला.
फटाक्यांच्या आतशबाजी आणि घोषणाबाजी करत हा जल्लोष करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे बढो, खासदार नारायण राणे आगे बढो., प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आगे बढो,,आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है घोषणा देण्यात आल्या. महायुतीचा जयजयकार करण्यात आला.

कणकवलीत महायुतीचा जल्लोष ; मुंबई महानगरपालिकासह राज्यातील विजयाचा आनंद
