Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मालवणात हॉटेल व्यवसायिकाला ५० लाखांची 'कॉपीराईट' नोटीस

मालवणात हॉटेल व्यवसायिकाला ५० लाखांची 'कॉपीराईट' नोटीस



व्यापारी महासंघाने घेतली गंभीर दखल ; आर्थिक लुबाडणुकीचा प्रयत्न असल्याची व्यक्त केली शक्यता

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील एका हॉटेल व्यवसायिकाला "हॉटेलमध्ये गाणी लावल्याबद्दल ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्या", अशी कायदेशीर नोटीस आली आहे. दरम्यान, हा प्रकार फसवणुकीचा असून व्यापाऱ्यांनी अशा नोटिसींना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी केले आहे.

संबंधित हॉटेल व्यवसायिकाला काही दिवसांपूर्वी एक पत्र मिळाले होते. त्यामध्ये "तुमच्या हॉटेलमध्ये वाजवली जाणारी गाणी ही 'फोनोग्राफीक परफॉर्मन्स लिमिटेड', अंधेरी-मुंबई या संस्थेच्या मालकीची आहेत. तुम्ही परवानगी न घेता ही गाणी वाजवून कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केले आहे," असा दावा करण्यात आला आहे.

काही दिवसांनंतर एका महिला वकिलाच्या नावाने थेट नोटीस पाठवून ५० लाख रुपयांच्या भरपाईची मागणी करण्यात आली. या अचानक आलेल्या मोठ्या रकमेच्या मागणीमुळे संबंधित व्यवसायिक भयभीत झाला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा व्यापारी महासंघाने याची गंभीर दखल घेतली आहे. नितीन वाळके यांनी पत्रकारांशी बोलताना यातील धोके स्पष्ट केले. या नोटिसीला कोणताही ठोस कायदेशीर आधार नसून हा केवळ आर्थिक लुबाडणुकीचा प्रयत्न आहे. अशा नोटिसींना उत्तर दिल्यास किंवा त्यातील लिंक्सवर क्लिक केल्यास मोबाईल हॅक होणे किंवा बँक खात्यातून पैसे चोरीला जाण्याचे प्रकार घडू शकतात. व्यापाऱ्यांनी अशा नोटिसींना उत्तर देऊ नये आणि घाबरून न जाता महासंघाशी संपर्क साधावा असे म्हटले आहे.

हा प्रकार पूर्णपणे फसवणुकीचा आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करून पैसे उकळण्याचा आहे. कोणत्याही व्यापाऱ्याला अशा प्रकारची नोटीस आल्यास त्यांनी तातडीने व्यापारी महासंघाशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. वाळके यांनी केले आहे.

जर आपल्याकडेही अशी कोणतीही संशयास्पद नोटीस आली असेल तर त्यावर कोणताही व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घ्यावा किंवा व्यापारी संघटनेला कळवावे असेही श्री. वाळके यांनी म्हटले आहे.

rapan bottom