Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी अत्यंत सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.


या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून महसूल व पोलिस विभागांमध्ये प्रभावी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याकडे सर्व संबंधितांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व पोलिस प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, श्रीमती आरती देसाई, उप मुख्य कार्यकारी शितल पुंड, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, विविध नोडल अधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, निवडणूक कालावधीत महसूल, पोलिस तसेच इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करणे अत्यावश्यक आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांवर कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ दखल घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करावे आणि आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सांगितले की, निवडणुकांच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणांनी सतर्क राहावे. चेकपोस्टवर तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक दक्षतेने काम करावे. तसेच दुर्गम व संवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर महसूल व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

rapan bottom