Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

महावितरण बाह्यस्त्रोत कर्मचारी यांस करिता माहिती व प्रशिक्षण कार्यक्रम

महावितरण बाह्यस्त्रोत कर्मचारी यांस करिता माहिती व प्रशिक्षण कार्यक्रम



कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे व कर्मचारी राज्य विमा कार्ड वितरण

शाखा प्रबंधक सुरेंद्र नाईक यांसह अशोक सावंत यांचेही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

सिंधुदुर्ग : कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि रिषु किचू इंडस्ट्रीज बीड यांचे संयुक्त विद्यमाने माहिती व प्रशिक्षण कार्यक्रम शिवशक्ती हॉल कणकवली येथे आयोजित करण्यात आला होता.



महावितरण बाह्यस्त्रोत कर्मचारी यांचे करिता कर्मचारी राज्य विमा मार्फत कर्मचारी आणि कुटुंबाला देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व फायदे याचे विश्लेषण शाखा प्रबंधक श्री सुरेंद्र नाईक यांनी केले. या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबतची माहिती श्री राहुल मांडवकर यांनी विस्तृत पणे मांडली. ठेकेदार श्री अरिफ तांबोळी यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षे विषयी प्रशिक्षण देवून जोखमीचे काम करताना स्वतःची सुरक्षा घेण्याविषयी भावनिक साद घालून प्रतिज्ञा घेतली.



यावेळी मार्गदर्शन श्री अशोक सावंत साहेब यांनी कर्मचाऱ्यांना एकसंघ राहण्यासंबंधी सूचना केल्या व मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमामध्ये कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे, तसेच कर्मचारी राज्य विमा कार्ड वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास कर्मचारी संघटनेमार्फत झोन अध्यक्ष श्री आनंद लाड, जिल्हा अध्यक्ष श्री संदीप बांदेकर, श्री संजय गोवेकर, श्री महेश राउळ, श्री दिनेश तांबे, श्री राजू दळवी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापक श्री समाधान चव्हाण यांनी केले. आभार श्री आनंद लाड यांनी मानले.

rapan bottom