सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले
फिर्यादी महिलेतर्फे जामीन अर्जावर हरकत नोंदवून ॲड. स्वरुप पई व यतिश खानोलकर यांनी बाजू मांडली
मालवण : मालवण भरड येथील राहत्या घरामधील महिला भाडेकरुला हाताला धरुन बाहेर काढून बेकायदेशीरपणे जेसीबीच्या साहयाने घर पाडून टाकल्याप्रकरणी दाखल गुन्हयातील संशयीत घर मालक यांचा अटकपूर्व जामीनअर्ज ओरोस येथील मे. प्रमुख सत्र न्यायाधीश यांनी फेटाळला. यामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. रुपेश देसाई यांनी काम पाहिले. तसेच फिर्यादी महिलेच्या वतीने जामीन अर्जास हरकत नोंदवून फिर्यादीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व यतिश खानोलकर यांनी मे. न्यायालयात बाजू मांडली.
फिर्यादी महिलेचा ताबा असलेल्या भरड मालवण येथील घराचे मालकाचे वाद सुरू असतानाच दि. 27/12/2025 रोजी घरमालक यांनी फिर्यादीस हाताला धरून बाहेर काढले आणि अर्वाच्च शिवीगाळ केली. त्यानंतर अनोळखी जेसीबी चालकाकरवी जेसीबीच्या साह्याने घर पाडून टाकण्या सुरु केले. त्यावेळी फिर्यादीने पोलीसांचे हेल्पलाईन वर फोन केल्यावर पोलीस जागेवर आल्याचे समजल्यावर संशयीत तेथून पळून गेले. याबाबत फिर्यादीने मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन संशयीत व अन्य 2 इसम यांचेविरुद्ध भारतीय न्याय्य संहिता कलम 74, 79, 333, 324(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
संशयित यांनी मे. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावेळी फिर्यादी महिलेकडून जामीन अर्जास हरकत घेण्यात आली होती. तसेच सरकार पक्षातर्फे गुन्ह्याच्या तपासाकरिता आरोपीची पोलिस कस्टडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद करण्या आला. त्यामुळे गुन्ह्याची गंभीरता व संशयीताची गुन्ह्याच्या तपासात असलेली आवश्यकता विचारात घेऊन मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांनी संशयीताचा जामीनअर्ज नामंजूर केला. याकामी मालवण पोलीस अधिक तपास करीत आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.

