आमदार निलेश राणे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिल्याबद्दल आभार
मालवण : मालवण नगर परिषद मधे स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी प्राप्त करून दिल्या बद्दल आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी आभार व्यक्त केले आहेत. त्याच प्रमाणे आमचे आमदार निलेश राणे साहेब यांनी पुढील पाच वर्षामध्ये मालवण शहराचे जे आश्वासक असे व्हिजन ठेवले आहे ते करण्यामध्ये सहभाग घेता येणार याचाही आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
महेश कांदळगांवकर म्हणले, २०१६ ते २०२१ या माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळात मालवण नगर परिषदे मधे अनेक विकासात्मक कामे करण्याची संधी मिळाली होती. या कालावधीत सुमारे दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे विकास कामे करण्यात अडचणी आल्या होत्या. या कालावधीत शासनाकडून निधी उपलब्धता बाबतही अडचणी होत्या. त्यामुळे काही विकासात्मक कामे सुरू होण्यास विलंब झाला.
आमच्या पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला विलंब झाल्याने जवळपास चार वर्षे प्रशासकीय राजवट होती. या प्रशासकीय कालावधीत ही कामे पूर्ण करण्यात दाखविलेल्या अनास्थे मुळे काही कामे अद्यापही अपूर्ण आहेत. आता स्वीकृत नगरसेवक प्राप्ती मुळे नूतन नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही कामे प्राधान्याने करून घेणे शक्य होणार आहे. त्याच प्रमाणे आमचे आमदार निलेश राणे साहेब यांनी पुढील पाच वर्षामध्ये मालवण शहराचे जे आश्वासक असे व्हिजन ठेवले आहे ते करण्यामध्ये सहभाग घेता येणार याचाही खूप आनंद आहे.
नगरपरिषदे मधे कर्मचारी म्हणून २१ वर्ष केलेली सेवा आणि त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून पाच वर्ष केलेल्या कामाचा अनुभव याचा फायदा मालवण शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त कसा होईल याकडे भर देण्याचा प्रयत्न राहील. आमदार निलेशजी राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ज्या विश्वासाने आणि ज्या कारणासाठी मला हे स्वीकृत नगरसेवक हे पद दिले आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अस काम मी माझ्या कालावधीत करेन याबाबत खात्री देत आहे. असे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगांवकर यांनी सांगितले.
▪️अमित खोत | मालवण

आमदार निलेश राणे यांच्या मालवण शहराच्या व्हिजन मधे सहभागी होता येणार याचा आनंद : स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगांवकर
