मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले दिपक पाटकर तसेच स्वीकृत नगरसेवक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे युवासेना पदाधिकारी यांनी भेट घेऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख संग्राम साळसकर, युवासेना तालुका प्रमुख अभी लाड, युवासेना तालुका प्रमुख स्वप्निल गावडे, वेरळ सरपंच धनंजय परब, युवासेना विभाग प्रमुख गीतेश खेडेकर, माजी उपसरपंच मकरंद सावंत, मालवण उपशहर प्रमुख संभव कुडाळकर यांसह शहर प्रमुख आनंद पराडकर आदी उपस्थित होते. या भेटी दरम्यान विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक जॉन नरोना, रामेश्वर मच्छिमार संस्था अध्यक्ष जगदीश खराडे हे ही यावेळी उपस्थित होते. मालवण शहरातील नागरिक, सामाजिक संस्था पदाधिकारी यांनीही दिपक पाटकर यांची भेट घेऊन अभिनंदन केले. मंगळवारी दिवसभर पाटकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता.
अमित खोत, मालवण

उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांचे युवासेना पदाधिकारी केले अभिनंदन
