वाहतूक मार्ग व जनतेचे हित लक्षात घेऊन आ. निलेश राणे यांच्या त्वरित कार्यवाहीच्या सूचना : जिप माजी सभापती अनिल कांदळकर यांचा पाठपुरावा
पोईप : मालवण तालुक्यातील पोईप विरण बाजार पेठेतील रस्त्यावरील ब्रीजचा काही भाग पावसाळ्यात कोसळुन वाहतुकीची कोंडी झाली होती सदर गंभीर समस्येची दखल घेऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांनी त्वरित बांधकाम करून घेऊन निर्माण झालेली वाहतूक समस्या मार्गी लावली होती. परंतु आता उर्वरित भाग खचला - असल्यामुळे पुन्हा वाहतुकीला धोका निर्माण झाला. ही बाब माजी वित्त बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी त्वरित बांधकाम उपविभाग मालवण यांना कळवली. त्या नुसार अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

वाहतूक मार्ग व जनतेची गरज लक्षात घेता आम. निलेशजी राणे यांच्या सुचनेनुसार संबंधितांना काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार खचलेल्या ब्रीजचे काम सुरू करण्यात आहे. कर्तव्यदक्ष कुडाळ मालवण मतदारसंघाचे आम. निलेश राणे व जनतेच्या समस्यां प्रशनी पाठपुरावा करणारे माजी सभापती अनिल कांदळकर यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे अधिकारी दिपक तोडमल, माजी वित्त बांधकाम सभापती अनिल कांदळकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख जितेंद्र ( बांबू ) परब, तालुका संपर्क प्रमुख पंकज वर्दम, विजय घाडीगांवकर, बाबाजी नाईक नाईक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

