Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

'एक पाय तुरुंगात आणि दुसरा संसदेत' या संकल्पनेवर विशेष कार्यक्रम

'एक पाय तुरुंगात आणि दुसरा संसदेत' या संकल्पनेवर विशेष कार्यक्रम

आनंद शितोळे यांचे होणार व्याख्यान : कणकवलीत १८ जानेवारीला बॅ. नाथ पै यांचा ५५ वा स्मृतीदिन सोहळा

मालवण : लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते आणि थोर समाजवादी नेते बॅ. नाथ पै यांचा ५५ वा स्मृतीदिन यावर्षी 'राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्ग' शाखेच्यावतीने १८ जानेवारी २०२६ रोजी गोपुरी आश्रम, वागदे कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजवादी नेत्या श्रीमती कमलताई परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. सेवा दलाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यंदाचा स्मृतीदिन "बॅ. नाथ पै स्मृती ५५ - एक पाय ज्याचा तुरुंगात आणि दुसरा संसदेत" या विशेष संकल्पनेवर आधारित आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक क्षेत्रातील अभ्यासक आनंद शितोळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ते 'जल-जंगल-जमीन: काल, आज आणि उद्या' या विषयावर विचार मांडणार आहेत.
या सोहळ्याला सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रविण बांदेकर, सेवा दलाचे ज्येष्ठ राष्ट्रीय कार्यकर्ते बाबासाहेब नदाफ, लेखक नितीन साळुंखे आणि 'रानमाणूस' म्हणून ओळखले जाणारे प्रसाद गावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गोपुरी आश्रमाच्या 'मुक्तपीठ' (चिकू बाग) येथे सकाळी १० वाजल्यापासून कार्यक्रमाची सुरुवात होईल.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी विनायक (बाळू) मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. यात सुहास ठाकूरदेसाई, संजय वेतुरेकर, नितीन वाळके, डॉ. सुभाष सावंत, मूर्ती कासार, सहदेव पाटकर, सुचन कोरगांवकर, विजयालक्ष्मी चिंडक, अर्पिता मुंबरकर, प्रज्ञानकुमार गाथाडे आणि पूजा वेतुरेकर यांचा समावेश आहे. बॅ. नाथ पै आणि प्रा. मधू दंडवते यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. प्रविण नाईक यांनी केले आहे.
१८ जानेवारीला सकाळी १० ते १०.३० यावेळेत नाव नोंदणी व अल्पोपहार, ११ वाजता अभिवादन, 'खरा तो एकची धर्म' प्रार्थना व दल गीताचे सादरीकरण (बाबासाहेब नदाफ), ११.२० वाजता स्वागत व प्रस्तावना नितीन वाळके आणि सुहास ठाकूरदेसाई करतील. प्रा. प्रविण बांदेकर यांचे बॅ. नाथ पै यांचे स्वप्न आणि वास्तव यावर व्याख्यान होईल. नितीन साळुंखे यांचे मी आणि संघ या विषयावर व्याख्यान होईल. आनंद शितोळे यांचे जल-जंगल-जमीन या विषयावर व्याख्यान होईल. बाबासाहेब नदाफ यांचे सेवा दल विचार आणि भवितव्य या विषयावर व्याख्यान होईल. प्रसाद गावडे यांचे रानमाणसाच्या व्यथा आणि कथा या विषयावर व्याख्यान होईल.
दुपारी १.३० वाजता श्रीमती कमलताई परुळेकर यांचे मनोगत होईल. २ ते ३ यावेळेत सहभोजन, ३ ते ४.३० यावेळेत मुक्त चर्चा व २०२६ सालातील उपक्रमांची आखणी, ४.४५ वाजता समारोप होईल.

rapan bottom