Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

श्री देव रामेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज त्रैवार्षिक भेट सोहळ्याची तयारी सुरु

श्री देव रामेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज त्रैवार्षिक भेट सोहळ्याची तयारी सुरु



जागेचे सपाटीकरण, साफसफाई पूर्ण ; नाला सफाई, वीज व्यवस्थेसाठी पालिकेकडे मागणी...


मालवण : कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज त्रैवार्षिक भेट सोहळा २३, २४ आणि २५ जानेवारी या कालावधीत होणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मेढा येथील जोशी वाडा परिसरात देवाचे आगमन होणाऱ्या जागेची विशेष स्वच्छता आणि सपाटीकरण करण्यात आले.
भक्तांच्या सोयीसाठी आणि भव्य मंडप उभारण्यासाठी या जागेची दुरवस्था दूर करणे आवश्यक होते. भाविकांच्या मागणीची दखल घेत जेसीबीच्या साहाय्याने माती टाकून संपूर्ण जागेचे सपाटीकरण करण्यात आले. तसेच परिसरातील कचरा हटवून साफसफाई करण्यात आली.
या सोहळ्यादरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजित जागेजवळील नाला साफ करणे आणि परिसरात पुरेसा प्रकाश राहण्यासाठी एलईडी लाईट्स लावण्याची मागणी मालवण पालिकेकडे करण्यात आली आहे.
या सर्व कामांच्या वेळी स्थानिक नगरसेविका मेघा गावकर, विद्या फर्नांडिस, राजा गावकर, विशाल आचरेकर, बाबा जोशी, काका जोशी, प्रशांत केळुसकर, अंकित जोशी, दादा जोशी, त्रिजय तांडेल आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री देव रामेश्वराच्या या पालखी सोहळ्यासाठी मेढावासीय सज्ज झाले असून प्रशासनाकडूनही सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

rapan bottom